Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: 'सही कर नाहीतर...', अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू; रोहित पवारांचा आरोप

शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवार गटाला असल्याची चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवार गटाला असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. काही नेत्याचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तुम्ही सही करा नाहीतच तुमची कामे होणार नाहीत, कदाचित असं सांगून त्यांच्यावर दबाव टाकला जात असेल असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

'कालच विधानसभेचे अध्यक्ष हे दिल्ली येथे कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी गेले होते. मग तिथूनच त्यांनी यांना फोन केला असावा म्हणून त्यांनी याचिका दाखल केली असावी. यामागे त्यांची काही रणनीती असेल. त्यांच काम ते करत आहेत. आम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पुर्ण करत आहोत. हा लढा न्यायालयात जाणार आहे. न्यायालयात विजय हा शरद पवारांचा होणार आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष सर्वस्व आहेत.'

शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवार गटाला असल्याची चर्चेवर रोहित पवार म्हणाले की, 'खरंच कोणी नाव दिलं आहे का? खरंच त्यांनी सह्या केल्या आहेत का? हे बघावं लागेल. तुम्ही सही करत नाही तो पर्यंत आम्ही काम करणार नाही, अशाही काही घटना घडत आहेत अशी माहिती आम्हाला मिळत आहे'. अशा पध्दतीने ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

'एका आमदाराला काय हवं असतं, त्याच्या मतदार संघातील प्रश्न सोडवावा म्हणून ते प्रयत्न करत असतात. अशी कामे करण्यासाठी सही कर नाहीतर काम होणार नाही असं ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचंही समजतं आहे. आता जरी त्यांच्याकडे मोठा आकडा दिसेल पण, निवडणूका येतील तेव्हा त्यांना कळेल खरचं किती लोक त्यांच्या सोबत आहेत', असंही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT