Rohit Pawar: बुधवारी (दि.६ सप्टेंबर) उमरगा माडज गावातील एका तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर गावकऱ्यांनी सांगितले की तरुणाने मराठा आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली. यावर आमदार रोहित पवार यांनी सर्व युवकांना कळकळीची विनंती केला.
कोणतेही पाऊल उचलण्याआधी युवांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा, असे पवार म्हणाले. यावेळी कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असा देखील सल्ला दिला.
मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी पसरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.(Latest Marathi News)
रोहित पवार ट्वीट करत म्हणाले की, "धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील माडज येथील किसन माने या तरुणाने मराठा आरक्षणासाठी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. माझी सर्व युवांना कळकळीची विनंती आहे की, आपण कृपया आपल्या कुटुंबाचा व स्वतःचा विचार करावा हा लढा सामूहिक आहे आणि एकत्रितरित्या आपल्या सर्वांना लढावं लागेल, त्यामुळे आपण कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये."
वामन माने नावाच्या उमरगा माडज या गावात राहणाऱ्या तरुणाने तलावात उडी मारत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर गावात चर्चांना उधाण आले. त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केली, असा संशय गावातील लोकांनी व्यक्त केला. मात्र, त्याने आत्महत्या का केली? याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.(Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.