रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

गडकरीजींनी सांगूनही भाजपनेत्यांची "राजकारणा"ची हौस फिटत नाही

ट्विट करून पत्रप्रपंचावर केली टीका

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर ः कोरोना काळात उपाययोजना करण्यापेक्षा विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवली जात आहेत. विशेषतः महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये हा पत्रप्रचंच सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पत्र लिहिलं आहे.

या पत्रावरून आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्य यंत्रणेच्या कामावर पाणी फेरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

(Rohit Pawar says, Devendra Fadnavis is only doing politics.)

फडणवीस यांच्या पत्रावर आक्षेप घेताना ते लिहितात, राज्य सरकार प्रामाणिकपणे कोरोना काळात काम करीत आहे. परंतु फडणवीस यांच्याकडून राजकीय हेतूने टीका होत आहे. त्यामुळं यंत्रणेचे मनोधर्य खच्ची होऊ शकते. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. विरोधकांकडून राजकारण होत असल्याने मला वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यायची आहे.

महाराष्ट्रामध्ये एकूण संक्रमणाच्या २२ टक्के संक्रमण असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अधिक आहे. आधीपासूनच टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर महाराष्ट्राने भर दिला आहे. त्यामुळे रूग्णसंख्या अधिक दिसते. दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिक नुकसानीची भरपाई, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनमध्येही खूप चांगला न्याय दिला, असं नाही.

पहिल्या लाटेपासून ते आता लस वाटपापर्यंत महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच झाला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भाजपची जिथे सत्ता आहे, त्याच राज्यांना झुकते माप दिले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ३५००० हजार कोटींची तरतूद आहे. तरीही राज्याला कोणतीही मदत दिली नाही. लसीकरणाचा भार राज्यावर टाकला आहे.

मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने उपाययोजना करून कोरोनाची साथ रोखली आहे. त्यामुळे आपोआप मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. तरीही फडणवीस आकड्यांची लपवाछपवी केल्याचा आरोप करत असतील तर ते चुकीचे आहे. भाजपाशासित गुजरातमध्ये 1 मार्च ते 10 मे 2021 दरम्यान 1 लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्र दिले. आणि प्रत्यक्षात मात्र या कालावधीत केवळ 4218 मृत्यू कोरोनाने झाल्याची नोंद केली. पण गेल्या वर्षी याच कालावधीत दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली तर यंदा तब्बल 1.20 लाख मृत्यूचे दाखले अधिक आहेत. याचं गौडबंगाल काय? यावर राज्यातील विरोधी का पक्ष गप्प आहे? महाराष्ट्राने कोणतीही फेरफार केलेली नाही.

तुम्हाला पत्रच लिहायचं असेल तर केंद्राकडून राज्याला मदत मिळावी म्हणून लिहा. परंतु तुमच्या एकाही नेत्याने ते डेरिंग केलं नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी केंद्राच्या PM CARE मध्ये मदत जमा करता यावर काय बोलायचं.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा ते दावा करतात. परंतु ती वस्तुस्थिती नाही.भाजपाशासित कर्नाटकसह अनेक राज्यात कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमधील रुग्ण प्रवास करून महाराष्ट्रात उपचारासाठी येतात. अनेक मृतदेह गंगा किनारी पुरले जात आहेत.

सुप्रीम कोर्टानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट व ऑक्सिजन पुरवठ्याची स्तुती केली. जागतिक अर्थतज्ञ आणि 'आरबीआय'चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही महाराष्ट्र सरकारचं कौतुक करतात.

तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले गडकरी साहेब कोरोनाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडं जाऊन काम करताना दिसतात. राजकारण न आणण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या असताना विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस काही फिटत नाही. अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहे, त्यासाठी पाठपुरावा केल्यास फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनता धन्यवाद देईल, असेही रोहित पवार लिहितात! (Rohit Pawar says, Devendra Fadnavis is only doing politics)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT