कॅलिफोर्नियातील सॅन होसे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आले आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन होसे येथील Guadalupe River Park या उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा होता.
या चोरीनंतर सॅन जोसच्या उद्यान विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, 'सिस्टर सिटी' मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे.
यासोबतच त्यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती देखील केली आहे. छत्रपतींचा पुतळा चोरी झाल्याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे. उद्यानातील हा पुतळा चोरी झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केली असू पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील मागितले आहे.
पुतळ्याचे पुणे कनेक्शन
पुणे शहराकडून अमेरीकेतील सॅन जोसे शहराला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. सॅन जोसे शहराला पुण्याची सिस्टर सिटी म्हणून हा पुतळा देण्यात आला होता. या दोन्ही शहरांमधील अनेक बाबतीत साधर्म्य असून दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आहे.
दरम्यान उत्तर अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सॅन जोसे शहरातील नागरिकांना खूप दुःख झाले असून या घटनेबाबतच्या अपडेट लवकरच दिल्या जातील, असेही उद्यान विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.