political News google
महाराष्ट्र बातम्या

MLA रोहित पवार मंत्री कधी होणार? शरद पवारांचं उत्तर, म्हणाले..

शरद पवार म्हणाले, मला आमदाराचा नामदार व्हायला पाच वर्षे लागली

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार म्हणाले, मला आमदाराचा नामदार व्हायला पाच वर्षे लागली

नुकताच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात यावरून वाद सुरु होता. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना धारेवरं धरलं होतं. दरम्यान, आता पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मंत्री कधी होणार, असा प्रश्‍न अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

रोहित पवार यांच्या मंत्रीपदाच्या प्रश्‍नावर थेट उत्तर न देता पवार म्हणाले, मला आमदाराचा नामदार व्हायला पाच वर्षे लागली. आमदार होऊन अडीच वर्षे झालेल्या रोहित पवार यांना मंत्री होण्यासाठी आणखी अडीच वर्षे थांबावे लागेल, अशी चर्चा या कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे. शरद पवारांच्या या उत्तरामुळे आमदार रोहित पवार आता लवकरच मंत्री होणार का असा सवालही उपस्थित होत आहे.

पुढे पवार म्हणाले, मी १९६७ साली आमदार झालो. नामदार होण्यासाठी त्यानंतर मला पाच वर्षे वाट पाहावी लागली. दरम्यान, राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबियांचा मोठा दबदबा आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ शरद पवार यांचे डावपेच आणि पुढाकारामुळे अस्तित्वात आले आहे. या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार काम पाहत आहे. आता या चर्चेमुळे पवार कुटुंबिय आणखी कोणती चाल खेळणार का, अशा चर्चाही होत आहेत.

आमदार रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांचा राज्यभर सर्वत्र संपर्क वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. शरद पवार यांचे विशेष लक्ष असूनही रोहित पवार अद्याप मंत्रीमंडळाबोहर कसे असा प्रश्‍न विचारण्यात येतो. मात्र, पवार यांच्या धोरणानुसार पुरेसा अनुभव घेतल्याशिवाय कुणालाही सत्तेची महत्वाची पदे दिली जात नाहीत. त्यामुळे रोहित पवारांना मंत्री होण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT