महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : ''कारवाईमागे राज्यातील एका नेत्याविषयी अंदाज योग्य होता, पण दुसरा...'' रोहित पवार म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या प्लँटवर २८ तारखेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने कारवाई केली होती. पहाटे दोन वाजता नोटीस देऊन ७२ तासांच्या आत प्लांट बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवार यांना हायकोर्टाकडून दिलास मिळाल होता. ६ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला दिले होते.

नोटीस पाठवल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यामागे दोन नेते असल्याचं म्हटलं होतं. कुठलातरी द्वेष मनात ठेवून ही कारवाई केली असं ते म्हणाले होते.

यासंदर्भातील पुढची पोस्ट आज (बुधवारी) रोहित पवार यांनी केली आहे. माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील नेत्याने माहिती दिली असून माझा एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता. परंतु दुसऱ्या नेत्याविषयी ऐकून आश्चर्य वाटल्याचं ते म्हणाले.

रोहित पवारांचं ट्वीट

माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टिंग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकून जरा आश्चर्यच वाटलं.

केवळ राजकीय द्वेष, या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत. त्यामुळं भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकिलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही.

कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे!

असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे तो दुसरा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT