Suresh_Khade_BJP 
महाराष्ट्र बातम्या

रिपाइं ते भाजप! जाणून घ्या सुरेश खाडेंचा मंत्रिपदापर्यंतचा राजकीय प्रवास

सुरेश खाडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. यामध्ये भाजपकडून आमदार सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपनं एका दलित उमेदवाराला संधी दिली आहे. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार ते भाजपचे मंत्री हा त्यांचा प्रवास जाणून घ्या. (RPI to BJP Know Surekh Khade political journey to become minister)

सन २००४ मध्ये सांगली जिल्ह्यातून निवडून आलेले सुरेश खाडे हे भाजपचे पहिले आमदार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सन १९९९ मध्ये जत मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि २००४ मध्ये ते जतमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. भाजपमध्ये ते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

१ जून १९५८ रोजी जन्मलेले डॉ. सुरेश खाडे याचं डिप्लोपर्यंत शिक्षण झालं असून कोलंबो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. सन २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेल्यानंतर पुढे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळेला ते मिरज मतदारसंघातून निवडून आले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे शेवटच्या चार महिन्यांसाठी सामाजिक न्यायमंत्रीपद देण्यात आलं होतं. दरम्यान, दुष्काळाच्या मुद्यावरुन त्यांनी विधानसभेत अनेकदा आवाज उठवला आहे.

दरम्यान, यंदा दुसऱ्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर सुरेश खाडे यांच्या मूळगावी नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधीत्व करत असल्यानं शिंदे-फडणवीस सरकारमध्येही त्यांनी सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

Assembly Election Voting 2024 : मतदान केंद्रावर राडा नडला! मतदान संपण्याआधीच उमेदवाराला पोलिसांनी केली अटक

Jharkhand Exit Poll: झारखंडमध्ये भाजप आघाडीला बहुमत; काय सांगताएत एक्झिट पोल?

Paithan Assembly Constituency Voting : आडुळ येथे शांततेत मतदान राञी उशीरा पर्यंत रांगा...

SCROLL FOR NEXT