Ajit Pawar_RR Patil 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "...तर आर आर पाटील मुख्यमंत्री झाले असते"; अजितदादांनी सांगितल 'त्यावेळी' नेमकं काय घडलं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेससोबत मोठ्या कालावधीसाठी सत्तेत राहिली पण अद्याप त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकलेली नाही, अशी सर्वांचा समज आहे. पण याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती त्यावेळी आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते असं अजितदादांनी सांगितलं. चिंचवडमध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने ते बोलत होते. (RR Patil would have become Chief Minister of Maharashtra says Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल एवढी संख्या जनतेनं दिलेली होती. पण राजकीय जीवनात काम करत असताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. पक्षाची शिस्त राखण्यासाठी वरिष्ठ पातळीवर घेतलेले निर्णय ऐकावे लागतात. २००४ मध्ये काँग्रेससोबत आमची आघाडी होती, तेव्हा राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसच्या लोकांनीही मानसिकता केली होती की, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल"

पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही, वरिष्ठांकडून निरोप आला की आपल्याकडं उपमुख्यमंत्रीपद राहणार. विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही सगळ्यांनी आर. आर. पाटलांची निवड केली होती. त्यामुळं मुख्यंमत्रीपद जर राष्ट्रवादीनं घेतलं असतं तर त्यावेळी आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते. पण आम्हाला तिथं संधी मिळाली नाही. शेवटी प्रयत्न करणं आपलं काम असतं आणि जनतेचा कौल देणं हे मतदारांचं काम असतं. पण त्यानंतर प्रत्येकवेळी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो, काँग्रेसच्या जास्त जागा आल्या त्यामुळं उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडं येत गेलं, अशी घटना यावेळी अजितदादांनी कथन केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT