mohan bhagwat esakal
महाराष्ट्र बातम्या

''मार्क्सवाद संपला, त्याची उत्तरक्रिया आपल्यालाच करावी लागेल'' मोहन भागवतांचा पुण्यातून डाव्या विचारसरणीवर हल्ला

योगिराज प्रभुणे

पुणे : ‘‘तथाकथित सांस्कृतिक मार्क्सवाद हे फक्त शब्द आहेत. त्यात संस्कृती नाही आणि मार्क्सदेखील नाही. त्यांनी मार्क्सला केव्हाच रद्द केला आहे. हे जागलेले नाहीत, तर वखवखलेले आहेत. त्यामुळे याची उत्तरक्रिया परंपरेने आपल्यालाच करावी लागेल,’’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी डाव्या विचारसरणीवर हल्ला केला.

लेखक अभिजित जोग लिखित ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाली. दिलीपराज प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित, प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव बर्वे उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, “डाव्यांविरोधात लढताना काहींना प्रतिकार करावा लागेल. भ्रमाचा पडदा फाडावा लागेल. खोटे उघडे करावे लागेल. लोकांनी भ्रमित होऊ नये, याची काळजीही घ्यायला हवी. आपण कोण आहोत, परंपरा काय, विचारधन, विज्ञान काय हे कळले पाहिजे. डाव्यांमुळे सगळे जग त्रस्त आहे. दडपले गेले आहे. ही लढाई लढणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक आहे. प्रतिकारासह समाज प्रबोधन करावे लागेल. कालसुसंगत नव्या रूपात आपल्या शाश्वत मूल्यांच्या आधारावर उभे राहावे लागेल.”

आपला धर्म काय?

सत्य, करुणा, सुचिता, तपस या चतुःसूत्रीवर धर्म उभा आहे. त्याला कोणाचेही वावडे नाही. आपला समाज कोणत्या एका पोथीत बांधलेला नाही. आपल्या इतिहासाने एक प्रमाण मानून कधीच व्यवहार केलेला नाही. वेदांप्रमाणे सगळे आचरण करत नव्हते. तरीही सर्व जण धर्माने वागत होते, असेही डाॅ. भागवत यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना डॉ. पंडित म्हणाल्या, “डाव्यांनी त्यांची ‘इको-सिस्टीम’ तयार केली असून, संघ विचारच याचा पराभव करू शकेल. आपण आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे. आपण हिंदू आहोत आणि एका उज्ज्वल परंपरेचे पाईक आणि वारसदार आहोत, याचा गर्व बाळगला पाहिजे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT