Jaydutt Kshirsagar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Jaydatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर खरंच शरद पवारांच्या संपर्कात आहेत?, संदीप क्षीरसागरांनी थेटच सांगून टाकलं

संतोष कानडे

Sandeep Kshirsagar Beed Politics : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातलं राजकीय वैर संपुष्टात आल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून बीडमध्ये सुरु होत्या. काका क्षीरसागर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं, यावर संदीप क्षीरसागरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी १६ जून रोजी बीडमध्ये एक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांची उपस्थिती होती. त्यामुळे काका-पुतण्यामध्ये समेट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत होता. याशिवाय जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांच्या संपर्कात असून तेदेखील पुण्यासोबत शरद पवारांच्या पक्षात काम करतील, अशीही चर्चा होती.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काका जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या अफवा आहेत, असं म्हटलं आहे. निवडणुका आल्या की ते (जयदत्त क्षीरसागर) प्रगट होतात आणि नंतर गायब होतात, अशीही टीका त्यांनी केली.

दुसरीकडे, खासदार बजरंग सोनवणे यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या घेतलेल्या भेटीवरही संदीप क्षीरसागरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विनाकारण वातावरण दूषित करण्याचं काम सुरु झालं आहे. ते उमेदवार होते, त्यामुळे ते भेट घेऊन आले, त्यात वावगं वाटण्यासारखं काय? असा प्रतिप्रश्न आमदार क्षीरसागरांनी उपस्थित केला.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांचं घर फुटलं असलं तरी त्यांचे दुसरे लहान बंधू आणि जे मागील ३० वर्षांपासून बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष आहेत; ते भारतभूषण क्षीरसागर त्यांच्यासोबत होते. तुलनेने संदीप क्षीरसागरांनी एकाकी झुंज दिली. आता पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलत आहे.

२०१९मध्ये शिवसेनेत गेलेल क्षीरसागर तिथे फार रमले नाहीत. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मागच्या दोन वर्षांपासून क्षीरसागर राजकीय विजनवासात होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची चर्चा झाली होती. शिवाय निवडून आल्यानंतर सोनवणे यांनी क्षीरसागरांची भेटही घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT