मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर गोवा येथे प्रचारासाठी गेलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) मुंबईला येण्यासाठी निघाल्या. पण, त्यांना फ्लाईट मिळालं नाही. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांना लिफ्ट दिली. याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP Leader Rupali Patil Thombare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अचनाक लता दीदी यांच्या निधनाची बातमी मिळाली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या चार्टर प्लेनंन त्याना गोवा टू मुंबई लिफ्ट दिली. खरंतर महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवली पाहिजे, असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं.
नेमकं काय घडलं? -
सध्या गोव्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. शिवसेना देखील गोव्यात काही जागा लढवणार असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या गोव्याला गेल्या होत्या. मात्र, भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं. ही बातमी कळताच मुंबईच्या पहिल्या नागरिक म्हणून महापौरांनी मुंबईला पोहोचण्याची तयारी केली. पण, त्यांना फ्लाईट मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस देखील गोव्यात होते. ते त्यांच्या चार्टर प्लेनने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळताच महापौरांनी विनंती केली. त्यानंतर फडणवीसांनी त्यांना लिफ्ट दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, गोवा सीएम प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेननं गोवातून मुंबईला आले. त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईपर्यंत आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.