Sachin Sawant News | Sachin Sawant on BJP | Latest Marathi News 
महाराष्ट्र बातम्या

'सत्तेच्या लालसेपोटी भाजपनं महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं पाप केलंय'

'११ दिवसांनंतरही मंत्रीमंडळ विस्तार होऊ नये हे दुर्दैव आहे'

सकाळ डिजिटल टीम

'११ दिवसांनंतरही मंत्रीमंडळ विस्तार होऊ नये हे दुर्दैव आहे'

विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन सेनेविरोधात बंड पुकारलं. यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. भाजपाच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतील आणि पुन्हा एकदा भाजप शिवसेना वाद उफाळून आला. (political news latest update)

आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्द्यांवरून टोलेबाजी सुरु असते. दरम्यान, आता कॉंग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी भाजप आणि फडणवीस-शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.(Sachin Sawant News)

ट्वीटमध्ये सावंत म्हणतात, ११ दिवसांनंतरही मंत्रीमंडळ विस्तार होऊ नये हे दुर्दैव आहे. सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप भाजपाने केले. अजूनही अस्थिरता संपली नाही. जाहीर करुनही इंधन दर कमी करता आले नाहीत पण गेल्या सरकारचे निर्णय रद्द केले. यांचे जनतेपेक्षा स्वतःच्या भवितव्याकडे लक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. (Sachin Sawant on BJP)

दरम्यान, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टानं आजहे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्वाचं आहे, त्यामुळं त्यावर तातडीनं सुनावणी होऊ शकत नाही. उद्याही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेऊ नये असं कोर्टानं आज सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT