पहाटेच्या शपतविधीवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधी हा शरद पवारांची खेळी असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही. कारण अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
ते म्हणाले की शेतामध्ये जेव्हा पीक येतं तेव्हा पीक आल्यानंतर तिथे राखण्या बसवल्या जातो. तो बसवला की तो पाखरांना येऊ देत नाही. मग पाखरांना प्रश्न पडतो की दाणे कसे खायचे. पाखर हुशार असतं. ते १, २ दिवस शेतात येत नाही आणि राखण्याला वाटतं आता पाखर येणं बंद झाली आणि तो पण झोपून जातो. पण अचानक ही पाखरं येतात हल्ला करतात आणि दाने खाऊन जातात.
राष्ट्रपती राजवट राज्यावर लागली की पाखरू रूपी पवार साहेबांना कळले की आता आपल्याला थोडं शांत राहावं लागेल. त्यामुळे त्यांनी देवेंद्र जी आणि भाजपवाल्यांना सांगितलं की मी येतो तुमच्या बरोबर.
अजित दादा येतील घ्या उद्या शाप्थविधी. राष्ट्रपती राजवट उठवली आणि राखण्या गेला की बरोबर दुसऱ्या दिवशी पवार साहेब यांनी सेनेला आणि काँग्रेसला घेऊन सरकार बनवलं. राखण्या घालवण्यासाठी पवार यांनी अजित दादांना पाठवलं होतं, असे खोत म्हणाले. पवारांनी हा डाव टाकला होता असेही खोत म्हणाले.
तर एस टी कर्मचाऱ्यांना घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरू
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराच्या मुद्द्यावर बोलताना खोत म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली. तसेच नागपूर अधिवेशनात देखील याविषयी चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल माहिती दिली आहे. सरकारला मी आव्हान आणि विनंती करतो की एस टी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या प्रकरणात गांभीर्याने बघा.
येथे आठ दिवसात जर बैठक लावली नाही तर आमच्या समोर आंदोलन शिवाय पर्याय रहाणार नाही असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
कोश्यारींना आदर म्हणूनच ते...
भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल बोलताना खोत म्हणाले की, त्यांना शिवाजी महाराज यांच्या विषयी आदर होता म्हणून ते सिंहगड, रायगड वर चालत गेले.
आता महापुरुष यांच्या बद्दल बोलायची भीती वाटायला लागली आहे. लोकांना की काही बोलताना चुकलं तर… ही टोळी आहे. शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि आम्ही पुरोगामी आहे असं म्हणायचं. यांना देवाने सर्टिफिकेट दिले आहे.
थोर महापुरुषांना लहान बनवू नका ती महाराष्ट्राची वैभव आहेत. त्यांना राजकारणात आणू नका. असे खोत म्हणाले. महापुरुषांच्या नावाने राजकरण करू नका ना तुम्ही तुमच्या लायकीवर आणि कर्तबगारीवर राजकरण करा असेही त्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांचे भविष्य समोर पाहून सरकारने एमपीएससीच्या नवीन पॅटर्न संदर्भात निर्णय घेतलेला आहे. आठ-दहा दिवस थांबून काय शासकीय आदेश होतात ते पाहूया नाहीतर आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करू असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.