Sakal Maha Brands sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Maha Brands : महाब्रॅंडमध्ये उलगडला महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा;‘सकाळ’तर्फे राज्यभरातील ६८ ब्रँड्सचा पुण्यातील सोहळ्यात सन्मान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विकासासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार, शेतकरी आणि महिला केंद्रित अर्थसंकल्प, परवडणारे शिक्षण, सक्षम आरोग्य सुविधा, पर्यावरण संरक्षण आणि अंत्योदयाचा दृष्टिकोन मांडणारा महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा ‘सकाळ’ आयोजित ‘ब्रॅंड्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान समारंभात उलगडला. सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेत्यांनी आपल्या दृष्टिकोनातील महाराष्ट्राचा धोरणात्मक अजेंडा ‘महाब्रॅंड्स’मध्ये शनिवारी (ता. २०) मांडला.

‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘ब्रॅंड्स ऑफ महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा, संस्थांचा आणि ब्रॅंड्सचा गौरव केला. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, कृषी, अभियांत्रिकी आदी क्षेत्रातील ६८ ब्रॅंड्सचा सन्मान विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अभिनेते सयाजी शिंदे, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आदी उपस्थित होते.

राज्याच्या प्रगतीला येथील उद्योग, व्यावसायिकांनी मोलाचा हातभार लावला आहे. देशात सक्षम व विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला घडविण्यासाठी अनेक ब्रॅंड्सचे मोलाचे योगदान आहे. राज्यात सर्वदूर उभ्या राहिलेल्या या संस्था आदर्श पद्धतीने काम करत असल्याचे समाजासमोर मांडून तरुणांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने ‘महाब्रॅंड्स’च्या माध्यमातून केला आहे. राज्याचे धोरण निर्माते असलेल्या नेत्यांनी महाराष्ट्राचा अजेंडा मांडला.

पुण्याच्या विकासासाठी सर्व पक्षातील खासदार एकाच बाजूला असल्याची भूमिका मोहोळ आणि सुळे यांनी मांडली. आरक्षणामुळे महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. निर्णय आणि नेतृत्व प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मुलींसाठी उच्चशिक्षण हा क्रांतिकारी निर्णय आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. त्यातून उद्योगांचा विस्तार आणि विकास होईल.’’ राज्याच्या अर्थसंकल्पात एक लाख १४ हजार कोटींची तूट असून, लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून राजकीय फायदा साधला जाईल; मात्र राज्याचे आर्थिक धोरण गडबडेल, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मुलांच्या डोक्यात आणि मनात झाडे रुजविण्याचे व्हीजन सयाजी शिंदे यांनी मांडले. वृक्षलागवडीत असंख्य अडचणी येत असून, समाजाने अधिकाधिक सहकार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य संपादक नीलेश खरे, संपादक सम्राट फडणीस, पुणे युनिटचे सरव्यवस्थापक रूपेश मुतालिक आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘राज्यावर १७ टक्क्यांपेक्षा कमी कर्ज’

विकासासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार अनिवार्य असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. लोकप्रिय योजनांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याच्या आरोप सरकारवर होत आहे. त्याबद्दल पवार म्हणाले, ‘‘राज्याला स्थूल उत्पादनाच्या २५ टक्के कर्ज घेता येते. महाराष्ट्रावर १७ टक्क्यांपेक्षा कमी कर्ज आहे. त्यामुळे राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचा खोटा आरोप विरोधक करत आहेत. लोकप्रिय घोषणा म्हणून नाही; तर अत्यल्प उत्पन्न गटातील महिला आणि आदिवासींच्या उन्नतीसाठी सरकारने योजना आखल्या आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT