Sakal Yin  esakal
महाराष्ट्र बातम्या

यिनच्या अधिवेशनाचे फलित; यिनचे मंत्रिमंडळ भेटले राज्याच्या मंत्रिमंडळाला

महाराष्ट्रातल्या युवकांच्या अनुषंगाने असलेल्या मागण्या झाल्या मान्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सकाळ माध्यम समूहाच्या (sakal media group) यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (YIN) च्या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाचे तीन दिवसीय विधिमंडळ अधिवेशन (legislative Assembly) नाशिक (nashik) येथे पार पडले. या अधिवेशनामध्ये विविध विषयांचे ३० महत्वपूर्ण ठराव चर्चिले गेले. त्यातील मुख्य पाच ठरावांवर संशोधन करून तरुणाईच्या सर्वांगीण विकासासाठीचे (youngsters development) ठराव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील (Maharashtra ministry) मंत्री महोदयांना प्रत्यक्षात भेटून निवेदन स्वरूपात देण्यात आले होते.

मुख्य पाच ठरावंमध्ये कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास व उद्योजकता विकास या पाच विषयांवर महत्वाची चर्चा झाली, आणि त्यातून महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाला प्रश्न रूपाने पुरवणी मागण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान त्या त्या विभागाच्या मंत्रिमहोदयांनी या मागण्या मंजूर केल्या आहेत तसेच संबंधित विभागाच्यावतीने अंमलबजावणी सुरू झालेली आहे. हे यिनच्या अधिवेशनाचे फलित असून येत्या काळात महाविद्यालयीन तरुणांना सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना यिनच्या मंत्र्यांनी मागणी स्वरूपात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यामध्ये

कृषी मंत्री दादा भुसे यांची यिन कृषीमंत्री वर्षा लोंढे (जालना), भाग्यश्री दहात, यिन प्रतिनिधी (मुंबई) यांनी भेट घेऊन निवेदन दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची यिन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री प्रवीण कोळपे (सातारा), मानस कांबळे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री, (मुंबई) विभूत सिंग (रायगड) रोहित चौधरी (मुंबई) यांनी भेट घेऊन निवेदन दिले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आकाश हिवराळे, यिन आरोग्य मंत्री (औरंगाबाद), वर्षा लोंढे (जालना) पायल भारसाकळे (जालना) प्रदीप वाघ (जालना) यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची सृष्टी मोरे, यिन महिला व बाल कल्याण मंत्री, प्रणाली जाधव (अमरावती), कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री नवाब मलिक यांची मानस कांबळे, यिन कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री, साक्षी जाधव, यिन माहिती, तंत्रज्ञान व जनसंपर्क मंत्री, विभूत सिंग (रायगड) आदित्य पंडित (ठाणे) यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

कृषी विभागाच्या असलेल्या मागण्या :

१) शेतकरी कर्ज मुक्त करण्यासाठी हुंडा बंदी कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. सिंचन क्षेत्र वाढवण्यासोबतच अत्याधुनिक यंत्राच प्रशिक्षण देणे, खासगी सावकारी बंद करणे, रोजगार हमीची बोगस कामे रोखणे, शेतकऱ्यांना जोड धंदा करण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरु करण्याची आवश्यकता आहे.

2) सरकारने सर्व पिकांना हमीभाव ठरवून देण्यसासाठी कायदा करावा. तसेच पेरणी करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाची हमी मिळाली तर शेतकरी जास्त आश्वस्थ होईल.

३) शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्यासंदर्भात निर्णय घेणार.

४) कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी.

५) तेलंगणा सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य देण्यात यावे.

६) ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर खाजगी सावकारीच्या धर्तीवर व्याजदर लावून खत विक्री केली जाते. शेतकऱ्यांना उधारी तत्त्वावर खते देताना दोन - तीन टक्के व्याज दर आकारून खते विक्रीच्या घटना उघड आहे. आपल्या स्तरावर योग्य पावले उचलून कारवाई करण्यात यावी.

मंजूर झालेल्या मागण्या:

१) शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांना आदेश देणार.

२) शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाला योग्य हमीभाव देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे

३) राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज शेतकऱ्यांना मिळावी. मराठवाडा अवर्षण प्रवण असल्यामुळे सूर्यप्रकाशाचे भरपूर दिवस मिळतात. कोरडवाहू शेतकऱ्यांना सबसिडी आणि लोन द्यावे, ते सोलर पॅनल उभारतील, त्यांची वीज महावितरणने खरेदी करून युनिटनुसार शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम देय करावी जेणेकरून मराठवाड्यासारख्या भागात शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल.

४) कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देणार.

५) शेतकऱ्यांच्या मुलींना विशेष अनुदान योजना राबविणार

६) खत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कृषी केंद्रांना आदेश देणार.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मागण्या :

१) कोवीड मुळे सर्व महाविद्यालय बंद केली आहेत, आता सर्व सुरू होत आहे तर लवकरात लवकर महाविद्यालये ही योग्य ती उपाययोजना करून सुरू करावी.

2) कोरोनामुळे जो पर्यंत ऑनलाईन शिक्षण आहे तो पर्यंत ज्यांच्या कडे मोबाईल नाही किंवा नेटसाठी पैसे नाहीत अशा महाराष्ट्रातल्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार करावा आणि त्यावर पर्याय काढावा.

३) कोरोना परिस्थितीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफ करावी.

४) कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झालेला आहे अशा विद्यार्थ्यांचा विचार करावा.

५) परीक्षा काळात पुर परिस्थिती मुळे ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा देता आली नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांना ही परीस्थिती निवळ्यावर परीक्षा देण्याची संधी द्यावी.

मंजूर झालेल्या मागण्या :

१) ४२ लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण किती झाले याची पूर्ण माहिती घेऊन राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करणार आणि त्यानंतर महाविद्यालय सुरू करणार.

२) पुणे मुंबई गडचिरोली येथे ऑनलाईन स्टुडिओ विद्यापीठाने आणि महाविद्यालय सुरू करावी असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जाईल.

३) विद्यापीठ संलग्न महाविद्यालये येतात त्यांची काही प्रमाणात फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

४) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक पूर्ण फी माफ केली.

५) पूर परीस्थिती ही नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एका वर्षाचा विचार करून ती परीक्षा नंतर अजून एकदा घेणार.

आरोग्य विभागाच्या असलेल्या मागण्या:

१. ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव

२. राज्यातील शासकीय रुग्णालयात औषध निर्मिताच्या जागा मोठ्याप्रमाणात रिक्त

३. लस पुरवठा कमी होत असल्याकारणाने लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

४. थैलेसीमिया ग्रस्त लहान मुलांना शासकीय रक्त पेढीतून वेळेत रक्त पुरवठा होणे गरजेचे आहे.

५. ग्रामीण भागात ऍम्बुलन्स सेवा गतिमान करण्यात यावी.

मंजूर झालेल्या मागण्या :

१. कोविड काळात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पाऊले उचलण्यात आली आहे आहे.

२. राज्यातील आरोग्य विभागातील पद भरती करिता शासन स्तरावर निर्णय प्रक्रिया राबवली जात आहे.

३. कोविड विरुद्ध लढण्यासाठी लसीकरण सर्वात प्रभावी अस्त्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

४. थैलेसीमिया ग्रस्त लहान मुलांना शासकीय रक्त पेढीतून रक्त पुरवठा करण्याबाबत सूचना दिली जाईल.

५. कोविड सारख्या रोगाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा लढ़ा देत आहे. कोविड विरुद्धच्या लढाईत नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या असलेल्या मागण्या:

1) महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, स्त्रीभृणहत्या, वाढत आहेत. याची कारणे समजून उपाययोजनांवर अंमलबजावणी केली गेली पाहिजे.

2) शहरातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सरचा धोका असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे.महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे.

3) स्त्रियांसाठी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा संख्येत वाढ करण्यात यावी.

4) बालविवाह व हुंडाबळी प्रथा बंद व्हावी,मुलींचा लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षावरून 21 करावी.

5) ॲसिड अटॅक आणि रात्री कामावरून घरी परतणा-या स्त्रीयांना रस्त्यावरून जाताना होणारा कट्यावरील टवाळ पोरांचा त्रास इत्यादी कारणांमुळे महिलांना सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या.

मंजूर झालेल्या मागण्या :

1) समाजातूनच या विषयीची जागरूकता निर्माण करणार, योग्य धोरण, चांगले कायदे, काटेकोर अमलबजावणी करणार.

2) वर्षातून एकदा तरी महिलांची आरोग्य तपासणी करणार,सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना

3) सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवणार, प्रत्येक महत्वाचा व गर्दीचा ठिकाणी सार्वजनिक स्वछतागृहे उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जागरूकता करणार.

4) मुलींना उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणार, गृहव्यवसाय सारख्या कल्पनेला संधी व मदत देणार. विद्यार्थिनींना शिक्षणासाठी असलेल्या योजनांबद्दल जागृत करणार.

5) महाविद्यालयात आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार. स्त्रियांच्या सुरक्षितता व हितासाठी काम करणाऱ्या संघटनांना पाठिंबा देणार.

कौशल्य विकास व उद्योजकता

विकास विभागाच्या असलेल्या मागण्या :

१) कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्र,

महाविद्यालयस्तरावर उपलब्ध करावीत.

२) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लघू उद्योग व स्टार्टअपसाठी जवळचे केंद्र उपलब्ध करावे.

३) मुलींना स्वयंरोजगारासाठी अनुदान वेळेवर मिळावे.

४) कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण संस्था कार्यान्वित कराव्यात.

५) जिल्हा उद्योग केंद्रात नवतरुणांना उद्योग उभारणीसाठी सतत येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात.

६) पोर्टलच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे.

मंजूर झालेल्या मागण्या :

१) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र युवती

उद्योजकता कक्ष स्थापन करणार.

२) विद्यार्थिंनीसाठी स्वतंत्र उद्योजकता कल्ब

तयार करणार.

३) मुलींना स्वयंरोजगारासाठी अनुदान

उपलब्ध करुन देणार.

४) कृषी प्रक्रिया उद्योगाला गावपातळीवर

चालना देणार.

५) राज्यातील आयटीआय चे कॉर्पोरेट सहयोगातून

अधुनिकरण करणार.

६) महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून युवक कौशल्य विकासाचे धडे देणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT