Sakal Premier Award 2023 sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Premier Awards : ‘सकाळ प्रीमियर’ सोहळ्यात चित्रकर्मींचा गौरव; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

यंदाचा अभूतपूर्व असा ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दिमाखात पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

यंदाचा अभूतपूर्व असा ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दिमाखात पार पडला.

ठाणे - दर्दी रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, मनोरंजनाचा सर्वोच्च धमाका, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त व ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांच्याबद्दल व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता आणि विक्रमादित्य नाट्यकर्मी प्रशांत दामले यांचा विशेष गौरव अशा हृद्य वातावरणात यंदाचा अभूतपूर्व असा ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी (ता. १२) दिमाखात पार पडला. चुरशीच्या स्पर्धेत ‘प्रीमियर सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा मान ‘वाळवी’ने पटकावला. ‘धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाने विविध विभागांतील सहा पुरस्कार पटकावून बाजी मारली.

‘मी वसंतराव’साठी निपुण धर्माधिकारी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. ‘धर्मवीर’साठी प्रसाद ओक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘गोष्ट एका पैठणीची’साठी सायली संजीवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पीएनजी ज्वेलर्स लि. सोहळ्याचे मुख्य प्रायोजक होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ‘सकाळ प्रीमियर अवॉर्डस्‌’चे आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सर्व विजेत्यांचा गौरव करण्यात आला तेव्हा खचाखच भरलेले नाट्यगृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले होते.

‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’चे यंदाचे तिसरे वर्ष होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अवघे तारांगण त्यासाठी डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अवतरले होते. खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक संजय वाघुले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट, नाट्य आणि वेबसीरिज क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले, ‘सकाळ’ (पुणे)चे संपादक सम्राट फडणीस इत्यादींबरोबरच मुख्य प्रायोजक पीएनजी ज्वेलर्स लि.चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्स लि.चे हेड (मार्केटिंग, सीएसआर अॅण्ड ई-काॅमर्स) हेमंत चव्हाण, पीएनजी ज्वेलर्स लि.चे सीएफअो किरण फिरोदिया, पीएनजी ज्वेलर्स लि.चे हेड (अॅडमिन अॅण्ड न्यू बिझनेस डेव्हलपमेंट) नीलेश कोळपकर, अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेन्मेंटचे संचालक रजत अग्रवाल आणि रेवा अग्रवाल, कार्यकारी संचालक अरविंद अग्रवाल, मार्केटिंग हेड ब्रिन्दा अग्रवाल, ‘अल्ट्रा झकास’चे बिझनेस हेड वेंकट गारापाटी, ‘सन नेटवर्क लि.’चे न्यू इनिशिएटिव्ह हेड सर्वानन पी., ‘सन मराठी वाहिनी’चे मार्केटिंग हेड धीरेंद्र यशवंत आणि फिक्शन (प्रोग्रॅमिंग) ग्रुप हेड लतिका सावंत, ‘ब्रिहन्स नॅचरल लि.’च्या व्यवस्थापकीय संचालिका शीतल आगाशे, ओरियन मॉल (पनवेल)चे प्रमोटर मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर तसेच ‘प्रशांत कॉर्नर’चे संस्थापक प्रशांत सकपाळ आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या सकपाळ आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांचा गौरव करण्यात आला.

बहारदार कलाविष्कार

सोहळ्यात झगमगाटी करमणूक होतीच, पण त्याचबरोबर अभिनेते संजय मोने यांनी सादर केलेले धमाल स्वगत होते. अभिनेत्री पूजा सावंत, मानसी नाईक, नेहा महाजन, स्वामिनी वाडकर, अमिता कुलकर्णी आणि अभिनेता पुष्कर जोग व रोहित शिवलकर यांचे बहारदार नृत्य होते. पुष्कर श्रोत्री आणि मृण्मयी देशपांडे यांचे नेहमीप्रमाणेच खुसखुशीत सूत्रसंचालन होते.

बालकलाकारांचा गौरव

यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते काही घोषित पुरस्कार. सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरले ‘बालभारती’मधील आर्यन मेघजी आणि ‘वेड’ चित्रपटातील खुशी हजारे. सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार ‘रौद्र’ चित्रपटासाठी अभिनेत्री ऊर्मिला जगताप हिला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्काराने ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटासाठी पुष्कर जोग याला गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट मार्केटिंग पुरस्कार ‘लीड मीडिया’चे विनोद सातव यांना देण्यात आला.

पुरस्कार विजेते

प्रीमियर सर्वोत्कृष्ट चित्रपट

वाळवी (झी स्टुडिओज / मयसभा करमणूक मंडळी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

निपुण धर्माधिकारी (मी वसंतराव)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट अभिनेता

प्रसाद ओक (धर्मवीर)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सायली संजीव (गोष्ट एका पैठणीची)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता (विभागून)

क्षितिज दाते (धर्मवीर) आणि सिद्धार्थ जाधव (बालभारती)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

अनिता दाते (मी वसंतराव)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट कथा

डाॅ. अजित वाडीकर (वाय)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पटकथा

मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी (वाळवी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट संवाद

प्रवीण तरडे (धर्मवीर)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट गीतकार

दिवंगत प्रणीत कुलकर्णी - हंबीर तू... (सरसेनापती हंबीरराव)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट संगीतकार

राहुल देशपांडे (मी वसंतराव)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

मनीष राजगिरे - भेटला विठ्ठल माझा... (धर्मवीर)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

आर्या आंबेकर - बाई गं... (चंद्रमुखी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

अविनाश - विश्वजीत (धर्मवीर)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट संकलक

जयंत जठार (वाय)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर

महेश लिमये (सरसेनापती हंबीरराव)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक

अशोक लोकरे / ए. रुचा (मी वसंतराव)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार

भाऊ कदम (टाईमपास ३)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक

उमेश जाधव - अष्टमी... (धर्मवीर)

सई, श्रिया आणि रकुलचा गौरव

अभिनेत्री सई ताम्हणकर हिला ‘प्रीमियर अल्ट्रा झकास फेस आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिचा ‘ओटीटी परफॉर्मर आॅफ द ईअर’ म्हणून सत्कार करण्यात आला. बाॅलीवूडमध्ये ठसा उमटविणारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंह ‘प्रीमियर ब्रेक थ्रू अॅक्टर’ची मानकरी ठरली.

श्रेयस आणि हृता यांना ‘ज्युरी स्पेशल’ पुरस्कार

ज्युरी स्पेशल पुरस्कारांमध्ये ‘वाय’ आणि ‘शिवप्रताप गरुडझेप’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले. ‘आपडी थापडी’साठी श्रेयस तळपदे याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. ‘अनन्या’तील कमालीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळे हिला सन्मानित करण्यात आले.

‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्याचे प्रक्षेपण लवकरच ‘सन मराठी वाहिनी’वर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT