मुंबई : गेल्या दोन वर्षांपूर्वी २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हे तीन पक्षांचं सरकार असल्याने जास्त काळ टिकणार नाही असा दावा विरोधकांनी वारंवार केला आहे. मात्र, सरकारने यशस्वीपणे दोन वर्ष सत्तेत पूर्ण (2 years of Maha Vikas Aghadi) केली आहेत. ठाकरे सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त 'सकाळ-साम'ने एक सर्वेक्षण (Sakal Saam Survey) केलंय. त्यामधील निकाल चकीत करणारे आहेत.
राज्यभरात सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सॅम्पल सर्व्हे करण्यात आला. याशिवाय २८८ मतदारसंघात गट चर्चाही घेण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व्हेसाठी २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या मतदारांची निवड करण्यात आली. हे सॅम्पल निवडताना शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखला असून महापालिका हद्दीतूनही सॅम्पल निवडण्यात आले. तसेच शिक्षण, आर्थिक, सामाजिक, लिंग, वय हे सर्व निकष लक्षात घेऊन हा सर्व्हे करण्यात आला.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढल्यास १७८ जागा मिळणार, तर भाजपला धक्का बसणार आहे. कारण भाजपच्या जागांमध्ये कमालीची घट होताना पाहायला मिळतेय. महाविकास आघाडी हे काँग्रेसशिवाय निवडणूक लढले तर महाविकास आघाडीला फक्त ३५ जागा मिळतील. भाजपला फक्त ६६ जागा मिळणार असं या सर्वेक्षणातून दिसतंय. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी निवडणूक झाली तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार आहे, असंच या सर्वेक्षणातून दिसतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.