Sakal Survey 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey 2024 : यशाची दोरी ‘ती’च्या हाती

कसभा २०२४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यांत महिला मतदारांसाठी खास आश्वासनांची लयलूट होती. विशेष म्हणजे महिलांसाठी भाजपने ‘लखपती दीदी’ तर ‘काँग्रेसने करोडपती दीदी’चे आश्वासन देत महिला मतदारांना या निवडणुकीसोबत बांधून ठेवले होते.

दीपा कदम deepakadam3@gmail.com

कसभा २०२४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यांत महिला मतदारांसाठी खास आश्वासनांची लयलूट होती. विशेष म्हणजे महिलांसाठी भाजपने ‘लखपती दीदी’ तर ‘काँग्रेसने करोडपती दीदी’चे आश्वासन देत महिला मतदारांना या निवडणुकीसोबत बांधून ठेवले होते. परिणामी महिला मतदारांचे बाहेर पडून मतदान करण्याच्या प्रमाणात अनेक राज्यांत वाढ झाली. राज्यात एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० मतदार होते. त्यापैकी महिला मतदारांचे प्रमाण ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ इतके होते. हे प्रमाण जवळपास ४८ टक्के आहे. त्यापैकी मतदान करणाऱ्या पुरुष मतदारांची टक्केवारी ६३.४५ टक्के इतकी आहे, तर महिला मतदारांचे प्रमाण ५९.०४ टक्के आहे. मात्र, अजूनही महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा राज्यात सरासरी चार टक्क्यांपेक्षा कमी आहे.

लोकसभा निवडणुकीतील ‘व्होटर पॅटर्न’ पाहिला तर शहरी भागांत महिला मतदारांचे मतदान करण्याचे प्रमाण सुधारलेले दिसते. मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघापैकी ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर पाचही मतदारसंघात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले आहे. मात्र विद्येचे माहरेघर असलेल्या पुण्यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५५.२५ टक्के आहे, तर महिलांचे ५१.७५ टक्के होते, हे प्रमाण सुधारण्यास वाव आहे. ग्रामीण भागातील मतदारसंघांमध्ये ते प्रमाण अद्यापही सुधारलेले नाही.

४८% महिला ‘मविआ’च्या बाजूने

राज्याच्या एकूण मतदारांच्या टक्केवारीत ४८ टक्के प्रमाण हे महिलांचे आहे, ज्याचे अनन्यसाधारण महत्त्व एव्हाना राजकीय पक्षांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीला तीन महिने असण्याच्या पूर्वी ‘सकाळ’ने केलेल्या सर्वेक्षणात महिला मतदारांनी उजवं डावं करण्याचा पक्का निर्णय केला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीला एकत्रित जाण्याची शक्यता गृहीत धरून महिला मतदारांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ४८ टक्के महिला मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला, तर ३१ टक्क्यांच्या जवळपास महिला मतदार महायुतीच्या बाजूने उभे आहेत. विशेष म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला एकत्रित झुकते माप महिला मतदार देत असल्या तरी भाजपला एक पक्ष म्हणून सर्वाधिक महिला मतदारांची पसंती आहे. महिला मतदारांमध्ये भाजप २८ टक्के, काँग्रेस २४ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष १४ टक्के, शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) १० टक्के, शिवसेना ५ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस पावणेचार टक्क्यांपेक्षा अधिक पसंती आहे. विशेष म्हणजे महिला वर्गात लोकप्रिय असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिलांमधील लोकप्रियता अत्यंत कमी झालेली आहे.

महिला मतदारांच्या मनातला मुख्यमंत्री कोण याची चाचपणीदेखील या सर्वेक्षणात ‘सकाळ’ने केली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आश्वासक वाटतो. तर राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाला पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची अधिक पसंती आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा सुधारल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारले जात असल्याचेही या पाहणीतून स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या ट्रेंडप्रमाणेच अतिउच्च आणि उच्च मध्यमवर्ग महिला मतदारांचा कल भाजपकडे अजूनही कायम दिसून येतो.

लोकसभेचा ट्रेंड अद्याप कायम

महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड देखील कायम आहे. अनुसूचित जाती - जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिला वर्गाचा कौल ‘मविआ’च्या बाजूने आहे. विशेष म्हणजे ‘मविआ’मध्ये हा कौल काँग्रेसला अधिक असल्याचे दिसते. काँग्रेसला लागलेली उतरती कळा या लोकसभा निवडणुकीत सुधारली. निवडणुकीवर परिणाम करणारा हा महिला वर्ग आज ‘मविआ’च्या बाजून दिसत असला तरी ‘मुख्यमंत्री ला़डकी बहीण’सारख्या योजनांचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT