Maharashtra Legislative Assembly Election Sakal Survey esakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey 2024: महाराष्ट्राच्या CM पदासाठी पसंती कोणाला? शिंदे, अजितदादांपेक्षा या दोन नेत्यांमध्ये तगडी फाईट

Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey 2024: सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, आगामी मुख्यमंत्री कोण असावा याबद्दल जनतेने एकनाथ शिंदे यांना नाकारले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तगडी स्पर्धा आहे.

Sandip Kapde

Maharashtra Vidhansabha Prepoll Survey: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना, सकाळ माध्यम समूहाने राज्यातील राजकीय परिस्थतीचा कानोसा घेतला. जूलैच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. सर्वेक्षणातून दिसून आले की, महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राचा झुकाव आहे. मतदारांनी भारतीय जनता पक्षाला राज्यातील सर्वात बलशाली पक्ष म्हणून पसंती दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी सर्व राजकीय पक्षांना एक संदेश दिला आहे.

सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, आगामी मुख्यमंत्री कोण असावा याबद्दल जनतेने एकनाथ शिंदे यांना नाकारले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तगडी स्पर्धा आहे.


फडणवीस व ठाकरे यांना समान पसंती-


सर्वपक्षीय नेत्यांमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान म्हणजे २२.४ टक्के पसंती मिळाल्याचे दिसते. भाजपमधून दुसरा पर्याय म्हणून ४७.७ टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे.


सर्वेक्षणाची पद्धत-


सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. राज्यभरातून २८८ विधानसभा मतदारसंघातून ८४५२९ मतदारांशी संवाद साधण्यात आला. सर्वेक्षण करण्यासाठी 'सकाळ'चे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते.

मतदारांची निवड-


मतदारांची निवड करतांना ४८ लोकसभा मतदारसंघांना २८८ विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागांची विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले. यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना (Stratified Random Sampling) पद्धत वापरण्यात आली.

सर्वेक्षणासाठी नमुना पद्धतीने लिंग, वय, आर्थिक उत्पन्न गट, नोकरी-व्यवसाय, शिक्षण, धर्म, जात या स्तरातून नमुना निवडण्यात आला. मतदान केलेल्या मतदारांना प्राधान्य देण्यात आले. महाराष्ट्रभरातून ६८ टक्के पुरुष, ३१ टक्के महिला आणि १ टक्के इतर मतदारांनी सर्वेक्षणात भाग घेतला.


कुणाला किती मिळाली पसंती?


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी २०२४ च्या निवडणुकीत आपण कोणाला पसंती द्याल? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता.

एकनाथ शिंदे- १४.५ टक्के
देवेंद्र फडणवीस-२२.४ टक्के
अजित पवार-५.३ टक्के
बाळासाहेब थोरात-
उद्धव ठाकरे-२२.४ टक्के
नाना पटोले-४.७ टक्के
जयंत पाटील-३.६ टक्के
सुप्रिया सुळे-६.८ टक्के
विजय वडेट्टीवार-०.९ टक्के
इतर-४.८ टक्के
सांगता येत नाही-१०.२ टक्के

(Maharashtra MLC Elections Sakal Survey)

नितीन गडकरी यांना भाजपमधून सर्वाधिक पसंती

भाजपमधून इतर कोण यावर अंदाज घेतला असता ४७.७ टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिल्याचे सर्वेक्षणाचे कल सांगतात. नितीन गडकरी यांना भाजपमधून ४७.१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना २.८ टक्के, देवेंद्र फडणवीस १८.८ टक्के, विनोद तावडे यांना ६.३ टक्के आणि पंकजा मुंडे यांना ०.५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT