Sakal Online Survey Live sakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदे : बंडखोरांची व्होटबॅंक निर्माण होणार, Sakal Survey तील निष्कर्ष

सकाळ डिजिटल टीम

Sakal Online Survey Live : महाराष्ट्र राज्यात सध्या जे काही सुरु आहे त्याची चर्चा देशभर सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. त्यामध्ये नेमकी कुणाचं सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा (eknath Shinde) अधिक आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये तळ ठोकला आहे. राज्यातल्या यागळ्या विविध घडामोडींवर आधारित एक सर्व्हे सकाळनं केला आहे. शिवसेनेत यापूर्वी तीन मोठी बंड झाली होती. यामध्ये छगन भुजबळ (1991), नारायण राणे (2005),राज ठाकरे (2005) अशी तीन मोठी बंड करण्यात आली आहेत. मात्र, तिन्ही बंडांच्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाचा शिवसैनिकांवर प्रभाव होता. त्यामुळे बंड होऊनही शिवसेना फुटली नाही. मात्र सध्या पक्षात फूट पडल्याचं मोठ्या घटकाचं मत आहे.

  • सकाळ माध्यमा समूहातर्फे राज्यातील एकूण परिस्थितीबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात नागरिकांना बंडखोर आमदारांना आपण पुन्हा मतदान करणार का? असा पाचवा प्रश्न विचारण्यात आला होता.

याविषयी प्रतिक्रिया देताना सकाळचे समुह संपादक श्रीराम पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात दोन गट आहे. शिवसेनेतील हा बदल अनेकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. शिवसेनेतील गट हाही अभ्यासाचा विषय आहे. छगन भुजबळ पहिल्यांदा बाहेर पडले होते. शिवसैनिकांचा रोष सर्वांना माहिती आहे. या राज्यामध्ये आता पहिल्यासारखी काही परिस्थिती नाही. आता बंडखोर आमदारांना संरक्षण दिले आहे.

शिवसेनेत जे बंड सुरुयं ते यावरुन शिवसेनेत फुट पडेल असे वाटते काय? त्यावर राज्यातील जनतेनं काय उत्तरं दिली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. या प्रश्नाचे उत्तर 43.3 टक्के लोकांनी शिवसेनेत फुट पडेल असे दिले आहे. तर 45.6 लोकांनी कुठल्याही प्रकारची फुट पडणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 11.1 टक्के लोकांनी आपल्याला या निर्णयबाबत काहीही सांगता येणार नाही. असे सांगितले आहे.

या सर्व्हेमध्ये चौथा प्रश्न बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शने/आंदोलन करणार का? असे विचारण्यात आले होते.

आक्रमकतेसाठी माहिती असणाऱ्या शिवसैनिकांचे या प्रश्नांला दिलेले उत्तर मात्र आश्चर्यकारक आहे. ३४.१% शिवसैनिक रस्त्यावर येऊन आंदोलन अगर विद्रोह करण्यास नकार देतो, तर १३.६% शिवसैनिक सांगता येत नाही असे म्हणतात. ५२.३% शिवसैनिक मात्र बंडखोरांविरोधात आक्रमक होऊ असं नोंदवतात.

शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणारा, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले असे मानणारा शिवसैनिकांचा एक वर्ग पक्षात आहे. बंडखोर आमदारांविरूद्ध रस्त्यावर उतरण्यास हा वर्ग नकार देणार, हे स्वाभाविक आहे. तथापि, या वर्गाहूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून बंडखोरांना विरोध करायचा नाही, असे टक्केवारी सांगते. निदर्शनांच्या प्रश्नावर जवळपास उभी फुट शिवसैनिकांमध्ये आहे. तिच भावना महाराष्ट्रात सरसकट दिसते आहे. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यात मावणारी गर्दी जितकी आहे, त्याहूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक एकतर आंदोलन करण्याच्या तयारीत नाही किंवा त्यांचा आंदोलनाचा ठोस निर्णय झालेला नाही.

तिसरा प्रश्न - बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं हा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

बंडखोर आमदारांना वारंवार पुढील विधानसभा निवडणुकीची भीती शिवसेनेच्या उर्वरित नेत्यांकडून घातली जात आहे. त्या भीतीमागे आधीच्या तिन बंडांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यात तत्थ्यही आहे. बंडखोर आमदारांना शिवसैनिक नाकारतात, या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा उर्वरित शिवसेना नेत्यांना आहे. बहुसंख्य शिवसैनिकांचीही तीच भावना यंदाच्या बंडखोरांबाबत आहे. सर्वेक्षणात ७६.३% शिवसैनिक बंडखोर आमदारांना नाकारतात.

सर्वेक्षणात १२.५ % शिवसैनिकांचा आमदारांना निवडणुकीसाठीही पाठिंबा कायम आहे. ११.१% शिवसैनिक याबद्दल निश्चित सांगू शकत नाहीत.

बंडखोरीची व्याप्ती, त्यांनाच पुन्हा मतदान करू इच्छिणाऱ्यांची टक्केवारी आणि अद्याप निर्णयापर्यंत न पोहचू शकलेल्या शिवसैनिकांची टक्केवारी पाहिली, तर बंडखोरांनी सारे बळ गमावले आहे, अशी परिस्थिती नाही. उलटपक्षी, शिवसैनिकांचा एक गट पाठीशी असताना भाजपची मते मिळण्याची त्यांची संधी वाढू शकते. महाविकास आघाडीच्या कामकाजावर नाराज आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान न करणारा वर्गही त्यांच्याकडे वळू शकतो. परिणामी, बंडखोरांची स्वतःची नवी मतपेढी तयार होण्याची शक्यताही सर्वेक्षणातून समोर येत आहे.

  • दुसरा प्रश्न - तुमची साथ कोणाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

    सर्वेक्षणात ८२.४ % शिवसैनिक म्हणतात की ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. शिवसेना हा पूर्णतः व्यक्तिकेंद्रीत पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि त्यानंतर त्यांचे पूत्र उद्धव ठाकरे यांचे पक्षात नेतृत्व आहे. भावनिकता हा व्यक्तिकेंद्रीत पक्षाचे गुणवैशिष्ट्य असते. हे गुणवैशिष्ट्य शिवसेनेलाॉ ततोतंत लागू आहे. त्यामुळे, ठाकरे आडनावाचा करिष्मा पक्षात शिंदे यांच्या बंडानंतरही कायम आहे.

    मात्र, शिंदे यांचे बंड व्यापक आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातील आमदारांचा त्यांच्या गटात समावेश आहे. परिणामी, ठाकरे यांच्यामागे शंभर टक्के सर्व शिवसैनिक उभे आहेत, असे दिसत नाही. वस्तुतः व्यक्तिकेंद्रीत पक्षाच्या प्रमुखामागे निर्विवाद पाठिंबा असतो. शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेत एक वर्ग असा तयार झाला आहे, ज्याला एकतर शिंदे गटाची साथ द्यायची आहे किंवा संभ्रम आहे. सर्वेक्षणातही १३.७% शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करतात. विशेष म्हणजे हा प्रतिसाद राज्यभरातून दिसतो. तर ----- शिवसैनिक मात्र अजूनही संभ्रमात आहे.

सध्या शिवसेनेत जे बंड सुरूय यावरून शिवसेनेत फूट पडली असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर सर्व्हेत 43.3 टक्के लोकांनी शिवसेनेत फुट पडेल असे म्हटले आहे. तर 45.6 लोकांनी कुठल्याही प्रकारची फुट पडणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 11.1 टक्के लोकांनी आपल्याला या निर्णयबाबत काहीही सांगता येणार नाही. असे सांगितले आहे. याविषयी अधिक विश्लेषण करताना सकाळ समुहाचे संपादक श्रीराम पवार म्हटले की, हा सर्व्हे शिवसेनेशी संबंधित आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यात जी फुट पडली आहे त्यातील काही प्रश्नांचा विचार करावा लागेल. शिवसेनेचे 2/3 आमदार सोडून गेले आहेत. ही गोष्ट नाकारता येणार नाही. विधिमंडळाच्या नियमांच्या दृष्टीकोनातूनही त्याचा विचार करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT