Sambhaji Bhide on Mahatma Gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide: महात्मा गांधींचे वडील कुठे नोकरी करायचे? संभाजी भिडेंच्या खोट्या आरोपामागची खरी कहाणी

राहुल शेळके

Sambhaji Bhide on Mahatma Gandhi: संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण आता तापले आहे. आता या प्रकरणी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे या आठवड्याच्या सुरुवातीला अमरावती येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले की, 'अमरावतीमध्ये संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल लज्जास्पद आणि अपमानकारक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे समाजात द्वेष पसरू शकतो.

या व्यक्तीला तात्काळ अटक करावी. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपमानकारक वक्तव्य करून ते मोकळे कसे फिरतात, असा सवाल त्यांनी केला.'पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सरकार भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करेल.'

संभाजी भिडे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले?

संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं होतं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते.

करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला.

त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य आहे का?

महात्मा गांधींच्या आजोबांपासूनच्या मागच्या तीन पिढ्या ते राज्यकारभार करत होते. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधींनी पोरबंदर सोडलं आणि त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला. ओता गांधींची एकामागून एक अशी दोन कुटुंबे होती.

पहिल्या कुटुंबापासून त्यांना चार मुलगे होते आणि दुसऱ्यापासून दोन. त्यापैकी पाचवे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी यांनी पोरबंदरमध्ये कारभा-याचे काम केले.

कबा गांधी हे महात्मा गांधींचे वडील पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर ते राजस्थानी कोर्टात सभासद होते. नंतर राजकोटला व काही काळ वाकानेरला दिवाण होते व मृत्युसमयी राजकोट दरबारचे ते पेंशनर होते. अशी माहिती महात्मा गांधींनी लिहिलेल्या 'सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा' या आत्मचरित्रात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT