Sambhaji Bhide esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंवरुन विधानसभेत घमासान; गृहमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान नाही, विरोधकांचा सभात्याग

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केली आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केली आहेत. हा मुद्दा आज चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभेत गाजला. विरोधकांनी भिडेंना अटक करावी ही मागणी लावून धरल्यानं सभागृहात मोठं घमासान पहायला मिळालं.

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं अखेर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विरोधकांनी सभात्याग केला. (Sambhaji Bhide Opposition members dissatisfied with HM Fadnavis answer and walked out of Vidhan Sabha)

विधानसभेत काय घडलं?

विधानसभेच कामकाज सुरु झाल्यानंतर सर्व वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांनी भिडे विकृत माणूस असल्याचं म्हटलं. त्यानंतर नाना पटोले यांनी सूचना दिली. यावर चर्चेची मागणी केली. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर शुक्रवारी चर्चा झाल्यानं तो पुन्हा चर्चेला घेता येणार नाही असं सांगितलं. त्यानतंरही काँग्रेस नेत्यांकडून गोंधळ सुरुच राहिला.

यशोमती ठाकूरांनी मांडला धमकीचा मुद्दा

यशोमती ठाकूर यांनी म्हटलं की, मला धमकी दिली आहे, त्यामुळं हा प्रश्न गंभीर आहे. यावर फडणवीस म्हणाले, भिडेंनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचावयला लावलं. दोन पुस्तकांचं वाचन करायला लावलं. अमरावतीत त्यांच्यावर २९ जुलै रोजी गुन्हा देखील दाखल झाला आहे. भिडेंचा गुरुजी म्हणून उल्लेख केल्यानं विरोधक आक्रमक झाले.

यावर फडणवीस म्हणाले, माध्यमांमध्ये जे विविध व्हिडिओ फिरत आहेत त्यांचे व्हॉईस सॅम्पल घेऊन त्याची तपासणी करण्यात येईल. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी जी तक्रार केली आहे ती अमरावती पोलिसांकडे पाठवली आहे. संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात पण त्यांना महापुरुषांवर वादग्रस्त विधानं करण्याचा अधिकार नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

नितेश राणे आक्रमक

त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले. त्यांनी थेट राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात विधान केली आहेत त्यामुळं त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, आमदार राम सातपुते आणि यशोमती ठाकूर यांच्यातही वाद झाला.

यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, भिडे काय बोलले या विषयावरुन बोलू नका आम्हाला धमकी आली त्यावर बोला. मी अमरावतीची महिला आमदार आहे. मी भिडेंविरोधात बोलले तर मला ट्विटरवर धमकी आली. यावर फडणवीस म्हणाले की, तुम्हाला सुरक्षा देऊ, ज्यांनी धमकी दिली त्याला अटक करु.

भिडे फ्रॉड माणूस - चव्हाण

यानंतर पृथ्वीराज चव्हाण देखील बोलू लागले माझ्यासह अनेक सदस्यांना धमकी आली आहे, याप्रकरणी कारवाई करावी, यामागचा सुत्राधार कोण आहे? हे शोधून काढावं, असंही ते म्हणाले. तसेच भिडे हा फ्रॉड माणूस आहे तो लोकांकडून सोनं गोळा करत आहे. कोणत्या संस्थेअंतर्गत तो सोनं गोळा करतो? तरुणांची दिशाभूल करुन बहुजन मुलांची तो फरफट करतो, असा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला.

यानंतर सरकारी बाजूनं गृहमंत्री भिडेंवर कारवाईबाबत कुठलंही ठोस उत्तर देत नसल्यानं त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं अखेर विरोधकांनी सभात्याग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

Ajit Pawar: विलासराव देशमुख हे उत्तम मुख्यमंत्री! आता CM पदाच्या शर्यतीत आहात का? अजित पवारांनी स्पष्ट केले मत

Chole Pattice Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार छोले पॅटिस, वीकेंडचा आनंद होईल द्विगुणित

तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

SCROLL FOR NEXT