Vijay Wadettivar 
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Nagar Cabinet: दीड हजारांची थाळी ते फाईव्हस्टार हॉटेलात मुक्काम; वडेट्टीवारांनी यादीच केली जाहीर

छ्त्रपती संभाजीनगर इथं उद्या कॅबिनेट बैठक होणार असून संपूर्ण मंत्रीमंडळ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या छ्त्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. यासाठी जय्यत तयार करण्यात आली असून संपूर्ण मंत्रीमंडळाची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यापार्श्वभूमीवर दुष्काळाच्या प्रश्नांसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं की मंत्र्यांच्या पर्यटनासाठी असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (Sambhaji Nagar Cabinet Meeting for tourism or distressed people Vijay Wadettiwar reveals expenditure list)

सरकारवर कडवी टीका

वडेट्टीवार यांनी ट्विट करुन संपूर्ण यादीच जाहीर केली आहे. यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा तपशीला आहे. त्यामुळं वडेट्टीवार म्हणतात, "राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. (Latest Marathi News)

सरकारनं जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?" (Marathi Tajya Batmya)

वडेट्टीवारांनी जाहीर केलेली यादी

  1. फाईव्हस्टार हॉटेल 30 रूम्स बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)

  2. ताज हॉटेल 40 रूम्स बुक (सर्व सचिव)

  3. अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)

  4. अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)

  5. महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)

  6. पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)

  7. वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे - 20 ( इतर अधिकारी)

  8. एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.

  9. औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.

  10. नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट, एका थाळीची किंमत 1 ते दीड हजार रुपये असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT