महाराष्ट्र बातम्या

मराठा आरक्षणासाठी नव्या राजकीय पक्षाबाबत संभाजीराजेंचं सकारात्मक उत्तर; म्हणाले...

विनायक होगाडे

मुंबई: आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील पुढची भुमिका स्पष्ट केली. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांची भेट घेत होते. यानंतर ते काय भूमिका काय घेतीय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, मी सर्व मराठा समाजाच्या वतीने बोलत आहे. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंनी सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत काह ठोस तोडगा काढला नाही, तर रायगडावरुन मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते म्हणाले आहे. तसेच सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचं त्यांनी आवाहन केलंय. तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाच्या स्थापनेची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय की, जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर निश्चित विचार केला जाईल. पण आज विषय हा मराठा समाजाचा आहे. मराठा समाजाला न्याय कसा दिला जाईल, ते सगळ्या पुढाऱ्यांनी आम्हाला सांगावं.

6 जूनला शिवाजी महाराजांनी स्वराज्य सुराज्य व्हावं अशी शपथ घेतली. त्यामुळे 6 जूनपर्यंत सरकारने यावर ठोस तोडगा काढला नाही, तर आमची भूमिका रायगडावरुनच स्पष्ट होईल. 6 जूननंतर कोरोना-बिरोना काही पाहणार नाही. लोकांना मी शांत केलं, नाहीतर उद्रेक झाला असता, असंही संभाजी राजे म्हणालेत. तसेच 9 ऑगस्टला क्रांतीदीन आहे. सकल मराठा समाजातर्फे दिल्लीत सर्व आमदारांना-खासदारांना निमंत्रित करणार आहे. मुख्यमंत्री -विरोधी पक्ष नेत्यांना बोलवणार. पहिल्यांदाच दिल्लीमध्ये गोलमेज परिषद भरवली जाणार असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT