मुंबई : संभाजीराजे हे उद्या शुक्रवारी (ता.२७) ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. याप्रसंगी राज्यसभा निवडणुकीबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याकडे त्यांच्या समर्थकांसह राज्याचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) अपक्ष लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. नेमके यावर उद्या ते काय बोलतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला. (Sambhajiraje Chhatrapati Tomorrow Take Press Conference On Rajya Sabha Election)
सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रद्वारे केली. दुसरीकडे शिवसेनेने पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी देऊ अशी अटी घातली. मात्र संभाजीराजे यांनी ही अट धुडकवून लावत अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज त्यांनी ट्विटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचयं, मी बांधील असेन तो फक्त जनतेशी ! या पोस्टबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाचा स्वतःचे छायाचित्र शेअर केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.