Sambhajiraje and Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : इथं आंदोलन सुरू केलं म्हणून पलीकडं आंदोलन करणे महाराष्ट्राला शोभत नाही; संभाजीराजेंचे हाकेंच्या आंदोलनावर भाष्य

Sambhajiraje on Manoj Jarange Patil Health : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत.

रोहित कणसे

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत. उपोषणाचा सातवा दिवस असल्याने मनोज जरांगे यांची तब्येत चांगलीच खालावली आहे. यापार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळाला भेट देत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी अंरवालीपासून जवळच सुरू असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी समाजाच्या आंदोलनाबाबत देखील भाष्य केलं.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मला कळलं की मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. म्हणून आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, तसेच छत्रपती घराण्यातील एक व्यक्ती म्हणून मी त्यांची तब्येत पाहायला आलोय. अत्यंत दुखः वाटत आहे की इतकी तब्येत खालावूनसुद्धा सरकार मुंबईत निवांत एअर कंडीशन ऑफीसमध्ये बसलं आहे. विरोधीपक्षातील लोक सुद्धा निवांत आहेत आणि फक्त बघण्याची भूमिका घेऊन बसले आहेत. हे चालणार नाही. आज कॅबिनेज बैठक आहे ना? मग निर्णय घ्या. होय किंवा नाही म्हणून टाका.

मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे की काहीही होऊ शकतं. त्याला तुम्हीच जबाबदार असाल अशा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला. तब्येतीबाबत मला जे काही बोलायचं ते मनोज जरांगे यांना सांगितले आहे. त्यांनी मला शब्द देखील दिला आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षण न मिळण्याला मी दोघांना जबाबदार धरतोय, पहिलं सरकार आणि दुसरं विरोधी पक्षांचा लोकांना. तुम्ही एकत्र या आणि ठरवा की आरक्षण देऊ शकता की नाही देऊ शकत असेही संभाजीराजे म्हणाले.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलं इतकं मोठं आंदोलन होत आहे. मनोज जरांगेंशी माझी कितीतरी वर्षांपासून ओळख आहे. मी पाहिलंय की किती प्रामाणीक लढा आहे ते. मी सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा देखील समावेश होता. आपण शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतो तर मराठ्यांना देखील न्याय मिळला पहिजे असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

आश्वासन दिलं, गुलाल लावला होता, त्यावर पुन्हा काही भाष्यच नाही. मनोज जरांगे यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सत्तेत बसलेल्या सरकारने भाष्य केलं पाहिजे. विरोधीपक्षाने देखील कसे आरक्षण देणार यावर भाष्य केलं पाहिजे. १० टक्के आरक्षण दिलं ते कसं टिकवणार हे देखील स्पष्ट करावं.

ज्या शिवाजी महाराजांनी सर्वांना न्याय दिला. शाहू महाराजांनी सर्वांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज देखील होता. शाहू, फुले आंबेडकर यांचे नाव घेत असाल तर सगळ्यांना न्याय देण्याची जबाबदारी देखील सरकार आणि विरोधी पक्षांची आहे. फक्त बोलून विधानसभेपर्यंत विषय घेऊन जायचा हे चालणार नाही, नाहीतर आम्ही पुढे काय ते पाहूण घेऊ असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

ओबीसी आंदोलनवर संभाजीराजेंचे भाष्य

वडीगोद्री येथे मराठा समाजबांधव आणि ओबीसी समाजाचे आंदोलनकर्ते यांच्यातील संघर्षाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य उभं केलं तेव्हा सर्व घटकांमधील लोकांना सोबत घेतलं. राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं ते फक्त मराठ्यांना दिलं नाही, तर सगळ्यांना दिलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना लिहून दिली आहे. जर कोणी घटनात्मक पद्धतीने कोणी आंदोलन करत असेल तर ते काही चूकीचं नाही. त्यांच्या मागण्या बरोबर आहेत की नाही ते न्यायालय ठरवेल. पण आंदोलन करणे सगळ्या समाजाचा हक्क आहे.

पण हे करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत नाही म्हणणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या न्यायाच्या हक्काचा लढा द्या. पण यांनी इथे यांनी आंदोलन सुरू केलं म्हणून पलिकडे जाऊन आंदोलन करायचं हे काही महाराष्ट्राला शोभत नाहीत.

स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करा, पण दुसऱ्यांनी आंदोलन करायचंच नाही. दुसऱ्यांच्या मागण्या बरोबरच नाहीत असं बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेत कुठेही म्हटलेलं नाही. रस्ते आडवत आहेत हे बरोबर नाही, सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. कोणी आंदोलन करत असेल तर त्याला अडवणे योग्य नाही असे संभाजीराजे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT