Samruddhi Highway Route esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील अपघातामूळे सरकारची चिंता वाढली, टायर तपासूनच वाहनांना समृद्धीवर प्रवेश

११ डिसेंबर ते ३० एप्रिल पर्यंत ३५८ अपघात

सकाळ वृत्तसेवा

Samruddhi Highway - समृद्धी महामार्गाची उभारणी करतांना प्रति ताशी १५० वेगमर्यादेची क्षमता असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाने सांगितले होते. तर १२० प्रती ताशी वेगमर्यादेची परवानगी देण्यात आली. मात्र सध्या स्थितीत गेल्यापाच महिन्यांमध्ये वाहनांचे एकूण ३५८ अपघात झाले असून, ४० पेक्षा जास्त नागरिकांनी वाहन अपघातात आपला जिव गमवल्याची माहिती महामार्ग पोलीसांनी दिली आहे. त्यामूळे आपण समृद्धी महामार्गांने प्रवास करत असल्यास वाहनांची काळजी घेण्याचे आवाहन महामार्ग पोलीसांकडून करण्यात येत आहे.

महामार्गावरील वाहन चालवतांना अशी घ्या काळजी

चारचाकी वाहन सर्वार्थाने उत्तम कंडिशन मध्ये असावे.

- टायर चांगले असावेत.

-  टायरमध्ये हवेचा दाब योग्य असावा.

-  टायर गरम झाल्यास पाणी योग्य तोंड देऊ शकते त्यामुळे टायर कंपनी महत्त्वाची नसुन टायर सुस्थितीत असावे.

- मोकळा रस्ता दिसला की लोकं स्पीड वाढवतात, 120 km स्पीडने जावेसे वाटते, पण तसे अजिबातच करू नये.

- कारच्या काचा बंद असल्याने स्पीडचा अंदाज येत नाही म्हणुन स्पिडोमीटरकडे लक्ष असावे.

- समृद्धी महामार्ग वन्यजिव प्राण्याचा वावर असल्याने पुर्णवेळ वाहन चालकांचे संपुर्ण लक्ष पुढे असावे.

- कडेला पांढर्‍या रेषा आहेत तिथेच थांबावे.

- झोप आल्यास, फ्रेश व्हायचे असल्यास 2/3 पेट्रोल पंप आहेत तिथेच थांबावे.

- इंधन आधीच भरून घ्यावे.

-  फक्त सरळसोट ड्रायव्हिंग असल्याने काही लोकांना झोप येऊ शकते किंवा ते बधिर होऊ शकतात त्यामूळे म्युझिक ऐकावे, गप्पा मारत गाडी चालवावी करावे.

-फुल्ल जेवण करून महामार्गावर वाहन चालवू नये, झोप येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT