Samruddhi Mahamarg Accident esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर सुविधांचा अभाव! दोनशे किमीमध्ये नाही अग्निशमन केंद्र; वाहन जळाल्यास प्रवाशांचा मृत्यू अटळ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतरही या मार्गावर प्रवाशांचे जीव वाचविण्याबाबत सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. नागपूरपासून दोनशे किमी अंतरात एकही अग्निशन केंद्र नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वाहन जळाल्यास प्रवाशांना मृत्यूशिवाय पर्यायच नसल्याचे वास्तव आहे.

समृद्धी महामार्गाचे मागील ११ डिसेंबरला लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंधरा दिवसांत अर्थात २८ डिसेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास पहिला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला होता.

एकूण पहिल्या महिनाभरात ४ गंभीर अपघात झाले असून यात १६ जण जखमी झाले. पाच किरकोळ अपघातात २० जण जखमी झाले. त्यानंतर या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात राजकीय धुरळाही उडाला. तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी विरोधकांनी केली.

राज्य सरकारने उपाययोजनांसाठी पाऊले उचलले. परिवहन, रस्ते सुरक्षा विभाग व पोलिसांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली.

आरटीओ अधिकारी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

परंतु यात टायर तपासणीसोबत नागपूर-शिर्डीदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे आठ ठिकाणी चालकांसाठी समुपदेशन केंद्र उभारणे यावर चर्चा झाली. परंतु या मार्गावर मदत केंद्रे नाहीत. अग्निशमन केंद्रही नाही.

शुक्रवारी रात्री बुलढाण्याजवळ बस जळाल्याने २५ पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ठराविक अंतरावर अग्निशमन केंद्राचा मुद्दा पुढे आला. नागपूरपासून दोनशे किमी अंतरात एकही अग्निशमन केंद्र नाही.

त्यामुळे या अंतरात एखादे वाहन जळाल्यास आग विझविण्यासाठी एक ते दीड तास प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत प्रवाशांचा जीव जाण्याचीच शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने उपाययोजनांबाबत पुढाकार घेतला असला तरी अग्निशमन व मदत केंद्राचे गांभीर्य कुठेही दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

प्रवासी व ट्रॅव्हल्सकरिता महामार्गावर सुविधांचा अभाव

शौचालय, प्रसाधनगृहांची सुविधा नाही

जेवणासाठी ढाबा, हॉटेल्स नाही

पेट्रोल पंपाची संख्या अतिशय कमी

बॅरीकेट्सला लावण्यात आलेले कुलूप. त्यामुळे यूटर्नसाठी ६०-६० किमी कापावे लागणारे अंतर

प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास यूटर्न घेण्यास होणारा त्रास

लोकार्पणानंतर महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात १५ अपघात

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात १५ अपघात झाले. यात तीन गंभीर तर नऊ किरकोळ अपघाताचा समावेश आहे.

यात दोघांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे अतिवेगाने वाहने चालविल्याप्रकरणी ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. केवळ महिनाभरात बुलढाणा जिल्ह्याने समृद्धीचे जीवघेणे रुप अनुभवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT