Buldhana Bus Accident 
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident: "अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात", समृद्धीवरील अपघातावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

Sandip Kapde

Buldhana Bus Accident :  उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर देखील टीका केली. आजचा अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज २५ लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल , असे संजय राऊत म्हणाले.

ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी तपासाव्या लागतील. भविष्यात त्या सर्व गोष्टी समोर येतील. दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, लोक मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही, किती वेळा श्रद्धांजली वहायच्या, असे राऊत म्हणाले.

वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली. त्यासंदर्भात काही होत नाही. समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने तयार झाला आहे.अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून तर अपघात होत नाहीत ना, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मोर्चा होणार-

आज शिवसेनेचा मोर्चा आहे पूर्ण ताकदीने होणार आहे.  या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत. जेव्हापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आलेली आहे. नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना येऊ दिला जात नाहीत.

या मोर्चात अडथळे यावे यासाठी अनेक गोष्टी करण्यात येत आहे. तरी हा मोर्चा निघत आहे. दुर्दैवाने समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. त्या शापित रस्त्यावर 25 जणांचा मृत्यू होरपळून झालेला आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात संवेदना आहेत पण जनतेच्या प्रश्नावरती हा मोर्चा निघणार आहे.

चोर मचाये शोर -

संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नौटंकी आहे. विशेषतः मुंबईतील भाजपा यांना कोणती दिशा नाही. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या ना म्हणजे शोर कोण वाजवते आणि चोर कोण हे जनता दाखवील. निवडणुका घ्यायच्या नाही लोकांना सामोर जायचं नाही आणि अशा नौटंकी करायच्या म्हणून आमचा मोर्चा पाहून जे आमचे राजकीय विरोधक आहे सत्ताधारी त्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील.

सर्व महापालिका प्रशासक ही लूट सुरू आहे. जनतेच्या पैशाची अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आजचा मोर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने रस्ते घोटाळा, स्टेट फर्निचर घोटाळा असतील  अनेक विषय आहेत त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarpanch Remuneration: सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojna: 'या' तारखेला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता; मंत्री तटकरे यांची माहिती

Supreme Court : चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे गुन्हा, मग कोणी व्हॉट्सॲपवर पाठवलं तर? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय काय सांगतो?

आबरा का डाबरा! Rohit Shrama ने सामना सुरू असताना केली बेल्सची अदलाबदल; Video Viral

Latest Maharashtra News Updates Live: लोकलमध्ये सापडली 20 लाखांची रोकड असलेली बॅग

SCROLL FOR NEXT