Samruddhi Mahamarg Accident esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आई-वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

कोपरगाव: समृद्धी महामार्गावर टेम्पोला कारने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह दीड वर्षाची मुलगी ठार झाली. अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत. पती व चिमुकली जागेवर मृत झाले, तर पत्नीचे उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी (ता. ३०) मध्यरात्री एकच्या सुमारास अपघात झाला.

संतोष अशोक राठोड (वय ३५), वर्षा संतोष राठोड (३५), अवनी संतोष राठोड (दीड वर्ष, रा. गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत.

शरद शिवाजी पवार (वय ३६, रा. ककडा भानू नाईक तांडा, पो. नेर, जि. जालना), एजाज सिराज पठाण (वय २४, रा. लोणार, ता. लोणार, जि. जालना), बलीबाई अशोक राठोड (५०), कृष्णा अशोक राठोड (२७).

कोमल कृष्णा राठोड (१९, गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना), नितीन राम पवार (२८, रा. मंठा, जि. जालना) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे कुटुंबीय जालना येथून विरार (मुंबई) येथे जात होते. कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारने (एमएच २२ एच २५२३) पुढे चाललेल्या टेम्पोला (एमएच २०, सीटी ६६५६) मागून जोराची धडक दिली.

याप्रकरणी टेम्पोचे चालक पांडुरंग राजू पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार रणजित तुकाराम राठोड (३२, रा. महोदरी, ता. मंठा, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

Anupam Kher: १.३० कोटींच्या नोटांवर गांधींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो, गुजरातमध्ये मोठा स्कॅम उघडकीस

Earthquake in Vidarbha : अमरावतीसह अकोट तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

"तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज नाही" ; घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर गौरव तनेजाच्या पत्नीने सोडलं मौन, म्हणाली "त्याला मी..."

SCROLL FOR NEXT