नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती करताना आम्ही मार्गाच्या दुतर्फा ठराविक अंतरावर प्रसाधन आणि विसाव्याची व्यवस्था करतो, अपघात प्रणव जागा शोधून त्रुटी दूर करतो. नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गावर याचा अभाव आहे.
हा राज्याचा प्रकल्प आहे. केंद्राचा संबंध नसला तरीही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
मोदी सरकारला नऊ वर्षे झाल्याच्या निमित्ताने गडकरी यांनी देशभरात रस्त्यांचे विणलेले जाळे आणि त्यांच्या विभागातील विकास कामांचा लेखाजोखा मांडला. भारतातील रस्त्यांची दखल केवळ देशातच नव्हे तर विदेशातही घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, ‘‘समृद्धी मार्ग राज्य सरकारने बांधला असला तरी या रस्त्यांवरील अपघातांबाबत लोक मलाच प्रश्न करतात. हा महामार्ग बांधणारी ‘एमएसआडीसी’ या संस्थेचा संस्थापक मीच आहे.
या मार्गावरील सुधारासाठी राज्य सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे. मुंबईत मी ५५ उड्डाणपूल बांधले तरीही त्यावर कोंडी होते. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. लोकांचे लोंढे महानगरांकडे येतात. त्यामुळे मुंबईसारख्या काही शहरांना वाहतुकीचा सामना करावा लागतो.’’
उपग्रह आधारित टोल
उल्लेखनीय कामासाठी मला चार डी.लिट मिळाल्या आहेत. रस्त्यांचा विकास पाहिजे असेल तर टोल कायम राहील. परंतु आगामी उपग्रह आधारित टोल पद्धती सुरू होईल. त्यामुळे वाहन जितके चालले असेल तितकाच टोल द्यावा लागेल.
लांब बस तयार करणार
रस्ता कितीही रुंद केला तरीही प्रश्न मिटेल, असे वाटत नाही. यासाठी सार्वजनिक परिवहन हाच एकमेव मार्ग उरतो. ही व्यवस्था उत्तम केल्यास लोकही खासगी वाहनांचा वापर करणार नाहीत.
दिल्ली- जयपूर आणि नागपूर-मुंबई दरम्यान ते इलेक्ट्रिक महामार्ग तयार करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. युरोपसारखे दोन-तीन बस एकत्र जोडून लांब बस तयार करण्यात येईल. बसची गती १०० किलोमीटर प्रति तास असेल आणि विमानाप्रमाणेच या बसमध्ये सेवा मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.