Sangali News: पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्यानं पत्नीने अगारप्रमुखांच्या दालनात आंदोलनाला सुरुवात केली आहे. सांगलीमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. (Sangali st employee husband leave wife protested bus depo)
पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्यानं सांगलीच्या आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केलं आहे. हे अनोख आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
Sheetal Mhatre Video : "तिचं आयुष्य बरबाद होईल"; व्हायरल व्हिडीओनंतर भाजपा आमदार आक्रमक
विलास कदम असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते गेल्या 33 वर्षांपासून राज्य परिवहन मंडळामध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. ते 70 दिवसांनी निवृत्त होणार होणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, विलास कदम हे गेल्या 33 वर्षांपासून एसटीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सत्तर दिवसांनी निवृत्त होणार आहेत. त्यांची एकूण 270 दिवसांची रजा शिल्लक आहे.
त्यांनी आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी अगारप्रमुखांकडे सहा मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र अगारप्रमुखांकडून त्यांना सुट्टी नाकारण्यात आली.
सुट्टी नाकारण्यात आल्यानं विलास कदम यांच्या पत्नी नलिनी संतप्त झाल्या. त्यांच्या पत्नीने आगारप्रमुखांच्या केबिनबाहेरच अंथरून टाकून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची सध्या सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.