Sanjay Gandhi Death Anniversary : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांची आज जयंती. त्यांची ओळख 'मॅन ऑफ अॅक्शन' अशी होती. संजय गांधींच्या आयुष्याशी निगडीत अनेक रंजक किस्से आपल्या ऐकिवात असतील, पण असा एक किस्सा आहे की जा ना कोणी ऐकलाय, न कधी कुठं सांगितला गेलाय.
त्या काळात आणि आजही टीकाकारांना संजय गांधी हुकूमशहा भासतात. 1975 ची आणीबाणी आणि त्यादरम्यान झालेल्या अतिरेकासाठी ते संजय गांधींना जबाबदार धरतात. एवढं असूनही युवक काँग्रेसच्या कार्याच्या केंद्रस्थानी असलेला संजय गांधीप्रणीत पाच कलमी कार्यक्रम त्यांच्यामधल्या द्रष्ट्या नेत्याकडे निर्देश करणारा होता, हे कुणीही नाकारू शकत नाही.
म्हणजे त्याकाळी पर्यावरणाचं कुणालाही काहीच पडलं नव्हतं, त्यावेळी त्यांनी झाडे लावण्याचा आग्रह धरला. लोकसंख्येच्या अनिर्बंध वाढीला आवर घालण्यासाठी त्यानी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. निर्वाणीच्या क्षणी आपल्या आईची साथ सोडणाऱ्यांना खड्यासारखे वगळून झाल्यावर संजय यांनी नव्या पक्षाच्या जडणघडणीवर लक्ष केंद्रित केलं होतं. आणि कदाचित याचमुळे संजय गांधी त्यांच्या आईच्या म्हणजेच इंदिरा गांधींच्या फार जवळचे झाले होते.
एक इंटरव्यू के दौरान यह बात सामने आई थी कि इंदिरा गांधी अपने ही बेटे, संजय गांधी के प्यार के दूर चले जाने से खुश थीं, लेकिन आप जानते हैं कि वो खुश क्यों थीं, तो चलिए आपको इस किस्से के बारे में बतातें है कि आखिर ऐसा क्यों था?
जी बाई संबंध देशावर नियंत्रण ठेवते तिच्यावर मुलाचं नियंत्रण असल्याची टीका विरोधकांनी केली होती. ते खरं असेल, नसेल पण इंदिरा गांधींचा आपल्या धाकट्या लेकावर अतिशय जीव होता. इतका की त्याचं प्रेम त्याच्यापासून दूर गेल्यावर त्या प्रचंड खुश झाल्या होत्या.आणि हा किस्सा स्वतः इंदिरा गांधींनी एका मुलाखतीत सांगितला होता.
खरं तर मनेका आयुष्यात यायच्या आधी संजय गांधींचं सँबिन नावाच्या मुलीवर प्रेम होतं. सँबिन क्रिस्टिनची बहीण होती. ही क्रिस्टिन म्हणजे, जिने संजय गांधींचे मोठे बंधू राजीव गांधी यांची सोनियाशी ओळख करून दिली होती.संजय आणि सँबिन दोघे एकमेकांच्या जवळ येऊनही एक होऊ शकले नाहीत. मारुती प्रकल्पाचे स्वप्न साकार करण्यात संजय गांधी इतके व्यस्त झाले होते की त्यांना समोर काहीच दिसत नव्हतं.
शेवटी सँबिन निराश होऊन युरोपला परतली. सँबिनचं विमान तेहरानला पोहोचलंच होतं, की संजय गांधी यांनी विमानाच्या पायलटला सूचना दिल्या आणि पायलटने विमान पुन्हा भारताच्या दिशेने परत आणलं. आता सर्व काही ठीक होईल या आशेने सँबिन पुन्हा दिल्लीला आली, पण नियतीला काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं.
सँबिन परतल्यानंतरही संजय गांधींच्या वागण्यात फारसा फरक पडला नव्हता. उलट काही दिवसांनी संजय आणखीनच मारुती प्रकल्पात गुंतले. सँबिनला आता हे सहन होत नव्हतं. शेवटी तिने संजय बरोबरच आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.काही दिवसांनी दोघांमध्ये उरलं सुरलं नातं होतं तेही संपलं. पण सँबिन पुन्हा युरोपला गेली नाही. ती दिल्लीत राहिली आणि दिल्लीतच एका शिक्षकासोबत संसार थाटला.
कुठलीही लव्हस्टोरी संपली की शेवट गोड होताना दिसत नाही. पण सँबिन आणि संजयचं नातं संपुष्टात आल्यावर इंदिरा गांधींना खूप आनंद झाला होता. आपल्या घरात दोन्हीही विदेशी सुना याव्यात अशी इंदिरा गांधींची इच्छा नव्हती म्हणून त्या आनंदी होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.