महाराष्ट्र बातम्या

जळगाव - महिला बचत गटांची ३०० कोटी रुपयांनी फसवणूक

26 जिल्ह्यात यांचे नेटवर्क सुरू असून प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक विषयांना घेऊन आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. मागील अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकारची पूर्वीच्या परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. राज्यात कोणतेही क्षेत्र लुटण्यापासून अलिप्त राहीलेले नाही. राज्यात महिला बचत गटाच्या गरीब सदस्यांची एका विशिष्ट रॅकेटच्या माध्यमातून फसवणूक करून तीनशे कोटींपेक्षा जास्त रकमेने लुबाडले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला चांगले काम करत आहेत. मात्र या महिला बचत गटातून एका खासगी संस्थेच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. राज्यसरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी केला आहे.

या बचत गटांचा राधाकृष्ण सेल्स कॉप्रोरेशनच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 26 जिल्ह्यात यांचे नेटवर्क सुरू असून प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. पॅकिंगची मशीन अधिक किमतीला विकली जात आहेत. ११०० ते १५०० रुपयाला मिळणार मशीन त्यांनी 11 हजारात विकली आहेत. याशिवाय आणखी एक मशीन 600 ते 700 रुपयांना मिळते. या कंपनी विरोधात एक तक्रार दाखल झाली आहे. हे लोक आता फरार आहेत. साताऱ्यातील घरही या लोकानी विकलं आहे. राष्ट्रवादीच्या मंगला चौहान यांनी 4 हजार मशीन विकल्या आहेत. याप्रकरणी मंगला चौहान यांना अटक झाली आहे. दरम्यान, या नेटवर्कच्या माध्यमातून करोडो रुपयाची महिलांची लूट केली आहे. आमचे या लोकांवर पूर्ण लक्ष असून गृहमंत्र्यांकडेही यासंदर्भातील तक्रार आली आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि मार्केटिंग करणाऱ्या पातळीवरील लोकांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. श्रमिक महिलांचे पैसे परत करावे, अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

राज्यात महिला बचत गटाच्या गरीब सदस्यांची एका विशिष्ट रॅकेटच्या माध्यमातून फसवणूक करून तीनशे कोटींपेक्षा जास्त रकमेने लुबाडले आहेत. एका राजकीय पक्षाच्या रॅकेटच्या माध्यमातून महिला बचत गट सदस्यांना शर्टचे बटन बनवून देण्याच्या मशीन आणि मसाला पंकिंग मशीन अव्वाच्या सव्वा किमतीने माथी मारून जळगाव व संग्रामपूर तालुक्यात सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये रोख स्वरूपात व फोन पेच्या माध्यमातून हडपणाऱ्या राधाकृष्ण सेल्स काॅर्पोरेशन आणि आर. के. सेल्स काॅर्पोरेशन पुणे व खुशाली पुरूषोत्तम निमकर्डे, पुरुषोत्तम रघुनाथ निमकर्डे हे विकास अधिकारी व अजित हिवरे सारखे भागीदार यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून बचत गटातील सदस्यांना त्यांच पैसे परत करावे, खुशाली पुरुषोत्तम निमकर्डे व पुरुषोत्तम रघुनाथ निमकर्डे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांचे फसवेगिरीचे पाळेमुळे राज्यात पसरलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

Latest Maharashtra News Updates : मतदारांवर प्रभाव टाकणारा राजकीय प्रचार केल्यास होणार कारवाई

SCROLL FOR NEXT