सध्या महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. हा सत्तासंघर्ष निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. (Sanjay Raut big statement about Maharashtra Shivsena BJP CM Eknath Shinde)
सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधताना महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वाक्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सध्या महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य आहे. राजकीय खेळीसाठी कुणावरही गुन्हे दाखल केले जात आहेत. आधी शिवसेनेचे तुकडे करा हे भाजपचे धोरण आहे. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. आणि त्यासाठीच त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले. असा पुन्हा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आमच्या अनेक लोकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आम्ही अधिवेशनात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ते एसीबीला दिसत नाही का? आमचे कल्याणचे विजय साळवी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत. त्यांना तडीपारीची नोटीस दिलीय. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. देशात सगळ्यात असुरक्षित राज्य महाराष्ट्र आहे.
राज्य सरकारमधील मंत्री उघडपणे कुणालाही जेलमध्ये टाकण्याची धमकी देतायेत. पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्र कायद्याच्या राज्यासाठी देशात प्रसिद्ध होतं. पोलिसांची प्रतिष्ठा जगामध्ये होती.
राजकीय स्वार्थासाठी आमच्या महाराष्ट्राचं नाव बदनाम करू नका. जर तुमच्या अंगात खरोखर रग, मनगटात ताकद असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांविरोधात बोला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा आदर्श घ्या. स्वाभिमान म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिका असं त्यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.