sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Goa Election:भविष्यात गोव्यात सेनेचा भगवा फडकेल ; संजय राऊत

शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे गोव्याशी जुने नाते; संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

वास्को (गोवा): आम्ही येतोय जातोय काम करतोय. गोव्यात जोरदार लढायच आहे असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावेळी ठरवले आहे. विधानसभेत आमदार जातील आणि भविष्यात गोव्यावर शिवसेनेचे राज्य येईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sajay Raut) यांनी दिली आहे. आज ते गोव्यात प्रचारसभेत बोलत होते. (Goa Election 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, मोदी म्हणतात गोव्याशी आमचे जुने नाते आहे. मग आमचे काय आहे. शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे गोव्याशी जुने नाते आहे.आमचे सगळ्यांचे देव गोव्यात आहेत. तुम्हाला काय याचे सर्टीफिकीट आणून दाखवू का असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

गोव्यातील जो मुळ पक्ष आहे त्याचे नाव महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे. त्या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर आणि बाळासाहेबांची जिवलग मैत्री होती. आम्ही शिवसैनिक येथे आलो नाही कारण बाळासाहेब आम्हाला सांगायचे भाऊसाहेबांचा पक्ष शिवसेनेचे काम करत आहेत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता आम्ही ठरवले आहे गोव्यात शिवसेनेचाच झेंडा फडकेल असेही राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, अर्धे गोवेकर मुंबईत आहेत आणि जे आहेत ते सगळे शिवसेनेत आहेत. गोव्यातील जो मुळ पक्ष आहे तो पण महाराष्ट्र या नावानेच आहे. शिवसेना गोव्यात आली आहे. तुम्ही कुठेही जा फक्त शिवसेनेची चर्चा आहे असे ही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT