Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण? असा प्रश्न...', सामनातून अजित पवारांवर टीका

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठींमागचं खरं कारण काय? संजय राऊतांनी याबाबतही दिली माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर आता शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवार शरद पवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणी मागे शरद पवार यांचीच खेळी असल्याची शंका अनेक नेत्यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीमागचं नवं कारण सांगितलं आहे. त्यामुळे आता वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना यावृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून शरद पवार अजित पवार यांच्या भेटीमागचं नवं कारण सांगितलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट राजकीय नसेल असं संजय राऊत यांनी रोखठोक म्हटलं आहे. शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातील या संस्था आहेत. त्या संस्थांवर शरद पवार यांनी अजितदादांना घेतलं आहे. त्यामुळे आता त्या संस्थांचं पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली असावं असं संजय राऊत यांनी केला आहे.

तर शरद पवार यांच्या हयातीतच अजितदादांनी त्यांच्या पक्षांवर दावा सांगितला. तिथे या संस्थांचे काय? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तर अजित पवार हे आजच्या घडीला राजकारणातील बडे नेते आहेत. पण सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण? असा प्रश्न महाराष्ट्राल पडेल, असंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे. शरद पवार यांनीच अजितदादांना राजकारणात आणलं आणि त्यांना यशाच्या शिखरावर नेवून ठेवलं. पण अजितदादांनी पवारांना त्याच शिखरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, असंही रोखठोकमध्ये लिहण्यात आलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती आणि सहकाराचे मोठे जाळे उभे केले आहे. या क्षेत्रात संस्था उभ्या केल्या आहेत. या संस्थांमध्ये हजारो शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थी आहेत. त्यांच्या भविष्याची चिंता आहे. ते ठरवण्यासाठीच पवार काका पुतण्यांमध्ये चर्चा झाली असावी, अशी शक्यता राऊत यांनी वर्तवली आहे.

शरद पवार-अजित पवार भेटीचा विषय मागे पडला आहे. तो मागे पडणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे. अजित पवार यांना स्वबळावर स्वत:चे मोठेपण सिद्ध करायचे आहे, तरच ते नेते ठरतील. त्यांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणुका लढवाव्यात. भाजपच्या मदतीने जे शिंद्यांनी केले तेच अजित पवार करत असतील तर त्यांचे राजकारण वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळेल. कारण राजकारणात बुरुजांना महत्त्व आहे. वाळूच्या किल्ल्यांना नाही, असंही रोखठोकमध्ये लिहण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT