sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: २०२४ला आम्हीही मास्टरस्ट्रोक खेळू, संजय राऊतांचा इशारा

Maharashtra Political Crisis:अजित पवारांच्या बंडाबद्दल संजय राऊत यांना विचारले केली असता त्यांनी त्यांचे मत मांडले.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांनी पक्षाशी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय गोंधळ निर्माण झाला. अजित पवारांच्या या बंडामुळे एक वर्षाआधी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला झाली. अजित पवारांच्या बंडाबद्दल संजय राऊत यांना विचारले केली असता त्यांनी त्यांचे मत मांडले.

भारतीय जनता पक्षाला विविध पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळतोय, याला काही भाजप नेते 'मास्टरस्ट्रोक' म्हणत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, " यांनी चक्क अंपायरच फोडलाय. दोन तास ED आणि CBI यांसारख्या एजन्सी आमच्या हातात द्या. २०२४ला आम्ही देखील मास्टरस्ट्रोक खेळू. आम्ही देखील मास्टरस्ट्रोक वर मास्टरस्ट्रोक मारु."

समान नागरी संहितेवर मांडले मत

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की," समान नागरी संहितेचा विषय भारतीय जनता पक्षाने सुरु केलाय. त्यांच्याकडील सर्व विषय संपलेले आहेत.मला वाटत देशामध्ये प्रत्येकासाठी कायदा समान आणि एक असला पाहिजे.

आपल्या देशात प्रत्येक धर्माचा वेगळा कायदा आहे. मात्र, या कायदा कोणत्या एका धर्मासाठी नसून तो देशासाठी आहे. . यावरील भूमिका आम्ही कायद्याचा मसूदा आल्यावर स्पष्ट करु."म्हणजेच समान नागरी कायद्याला मसूदा आल्यानंतर पक्षाची भूमिका ठरणार, असे राऊत यांच्या मतावरुन स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा घोळ कायम; तुर्त ‘८५’ च्या फॉर्म्युल्यावर एकमत; अन्य ३३ जागांवर चर्चा

Priyanka Gandhi : वायनाड हे माझ्यासाठी कुटुंबच; काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Elections 2024: नेत्यांनो, शिव्यांचा वापर करू नका!

SCROLL FOR NEXT