Sanjay Raut on RSS e sakal
महाराष्ट्र बातम्या

... तर RSS ला जनाब संघ म्हणणार का? : संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एमआयएमकडून (AIMIM) महाविकास आघाडीला प्रस्ताव आला आहे. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर 'जनाब' अशी टीका केली जात आहे. त्यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजप आणि आरएसएसवर (RSS) निशाणा साधला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्य पाहिली तर तुम्ही आरएसएसला जनाब संघ आणि मोहन भागवतांना जनाब संघाचे प्रमुख म्हणणार का? असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे. शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्त संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (Sanjay Raut on RSS)

जनाब हा शब्द मुसलमानाला म्हणतात. त्यांचे हजारो मतदार हे भाजपला मतदान करत असतील. एक हिंदूत्वाची विचारधारा घेऊन जाणारी संघटना म्हणजे आरएसएस नागपुरात आहे. सरसंघचालकांचे गेल्या काही काळातील वक्तव्य पाहिली तर तुम्ही संघालाही जनाब संघ म्हणणार का? मोहन भागवतांनी सर्वांचा डीएनए एकच आहे असं म्हटलं होतं? म्हणून ते जनाब संघाचे प्रमुख झाले का?, असं संजय राऊत म्हणाले.

'तपास यंत्रणा भाजपचे कार्यकर्ते' -

केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणांच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. ईडीने ममता बॅनर्जींच्या भाच्याला चौकशीसाठी बोलावलं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय नागरिकाला ईडीचं भय दाखवलं. तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागतात. आम्ही दिल्लीसमोर अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा तर प्रश्नच सोडा, असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागेकडे शिवसेनेचं अधिक लक्ष -

विदर्भानं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर खूप प्रेम केलं. आमचे खासदार निवडून दिले. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातून शिवसेनेचं विधानसभेतील प्रतिनिधित्व कमी झालं आहे. त्याला काही कारणं आहेत. ते कमी करण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करत आहोत. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे सुरुवात नागपुरातून करत आहोत. नागपुरात येऊन राजकारण करण्याची गरज नाही. आमचा पक्ष वाढविण्याची गरज आहे. दुसऱ्यांना पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे आम्हाला देखील अधिकार आहे. ज्या जागा महाविकास आघाडीकडे त्यांच्याकडे शिवसेनेचं अधिक लक्ष आहे. कोल्हापूर उत्तरची जागा अनेकवर्ष शिवसेना जिंकतेय. शिवसेना-भाजपची युती असताना आमचे उमेदवार निवडून आले. पण, काँग्रेसच्या उमेदवाराचं निधन झालं. त्यामुळे काँग्रेस ती निवडणूक लढतेय. उत्तर कोल्हापूरच्या जागेचा आम्ही २०२४ ला विचार करू, असंही राऊत म्हणाले.

भावना गवळी कुठे गायब आहेत? -

भावना गवळी सध्या दिसत नाही, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावेळी राऊत म्हणाले, ''भावना गवळी आम्हाला दिसत नाही. याचा अर्थ त्या शिवसेनेत दिसत नाही असं नाही. त्यांच्यामागे केंद्र सरकारने ईडीचा ससेमिरा आहे. त्यांना कोर्टात जाणं गरजेचं होतं. त्यामुळे पक्षाची परवानगी घेऊन त्या न्यायालयात गेल्या आहेत. भावना गवळींनी हजर न राहण्याबाबत रितसर परवानगी घेतली.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT