Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या; राऊत संतापले

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला.

संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असं म्हटलं जातंय. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, शिंदे गटामध्ये सध्या काय सुरुय, कुणाचं बिनसलंय याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. यांच्या पिढ्यांना ही 'गद्दारी' शांत जगू देणार नाही.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सुरक्षेच्या बाबतीत बोलतांना राऊत म्हणाले, यांनी आमच्या सुरक्षा काढल्या पण काहीही फरक पडत नाहीत. त्यांनी स्वतःच्या सुरक्षा काढून बघाव्यात मग कळेल महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ती. असं म्हणून संजय राऊत यांनी जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्याबद्दलही विधान केलं. त्या पाण्यात सरकारने जलसमाधी घ्यावी, असं राऊत म्हणाले. कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT