political esakal
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधान मोदी 'द काश्मीर फाईल्स'चे प्रचारक, राऊतांचा घणाघात

'राज्यपालांनी वारंवार कायदा भंग केला असून राज्यघटनेचाही भंग केलाय'

सकाळ डिजिटल टीम

'राज्यपालांनी वारंवार कायदा भंग केला असून राज्यघटनेचाही भंग केलाय'

देशाचं राजकारण हे पक्षांच्या दबावाखाली केले जातं आहे. पंतप्रधान मोदी हे द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे स्टार प्रचारक आहेत, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याशिवाय राज्यपालांनी वारंवार कायद्याचं उल्लंघन केलं असून राज्यघटनेचाही भंग केला आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केला आहे. आज ते दिल्लीत बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले, तत्कालीन परिस्थिती पाहून काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या, ही बाळासाहेब ठाकरे यांची होती. महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवत विस्थापित कश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी कायदा करून घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. त्याकाळी काश्मीरी पंडितांच्या समस्येबाबत बाळासाहेबांनी आवाज उठवला होता, बाकी सगळे गप्प होते. मोदी हे देशाचे पंतप्रधान (PM Modi) आहेत मात्र भाजपने त्यांना एक पक्ष नेते बनवले आहे. भाजपाकडून पक्षांच्या दबावाखाली राजकारण केले जातं आहे. पोलिस खोटे गुन्हे दाखल करत नाहीत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाचा वापर केला जात आहे. जेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांची चौकशी होते, तेव्हा भाजपनला गुदगुल्या होतात. मग आता का रडताय, चौकशीला सामोरे जा, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

दरम्यान, राज्यपाल राजकारण करत आहेत. राज्यापालांकडून (Bhagat Singh Koshyari) ही अपेक्षा नाही. राज्यपालांनी वारंवार कायद्याचं उल्लंघन केलं असून राज्यघटनेचाही भंग केला आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मविआ सरकारच्या नेत्यांच्या चौकश्या होतात तेव्हा भाजपला गुदगुल्या होतात, राज्याची तपास यंत्रणा तुमची चौकशी करू शकत नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT