आहिल्याबाई होळकर किंवा इतर कोणत्याही महापुरुषांचं राजकारण कुणीही करु नये - राऊत
वैफल्यग्रस्त पक्ष, माणसं आणि नेते कोणत्या थराला जाऊ शकतात याच उदाहरण म्हणजे विरोधकांची विचारसरणी आहे. आहिल्यादेवी होळकर किंवा इतर कोणत्याही महापुरुषांचं राजकारण कुणीही करु नये. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारख्या नेत्याच्या हातून एखाद्या स्मारकाचं उद्घाटन होत असेल तर त्याला राजकीय विरोध केला जात असेल तर विरोधकांच्या नियतीतच काहीतरी खोट आहे, अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. हे अस राजकारण करत विरोधकांकडून राज्यात खोटेपणाचा कळस उभारला जातोय असंही ते म्हणाले.
ते म्हणाले, खोटं बोला पण रेटून बोला ही भाजप (BJP) नेत्यांची सवय आहे. भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारची बदनामी सुरु आहे. जोपर्यंत उपक्रमांना पाठबळ आणि सार्वजनिक उद्योगांना ताकद दिली जात नाही, तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. मागील काही वर्षांपासून देशाला पब्लिक सेक्टरने (सरकारी) सर्वाधिक रोजगार दिला आहे. त्यामुळं हे उद्योग बंद पाडून आपल्या मर्जीतल्या उद्योजकांना कंत्राटं देऊन रोजगार वाढणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अशामुळंं फक्त ठराविक उद्योजकांची संपत्ती वाढेल, पर्यायानं भाजपची संपत्ती वाढणार आहे. केंद्र आता खासगी (Private Company) लोकांना मोठं करत आहे. यामुळं अनेक लोक बरोजगार होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, जर तुम्ही हिंदुत्वावादाचा पुरस्कार करत असाल तर तुम्ही खरं बोलता का हे तपासून पहा. राज्याच्या राजकारणात लफंगेगिरी सुरू आहे, त्याला हिंदुत्वात स्थान नाही. खोटं बोलावं रेटून बोलावं ही विरोधकांची सवय आहे. खरं बोलण्यासाठी सहज आणि सत्य बोलाव लागतं. खरं बोलण्यासाठी रेटून बोलण्याची गरज नाही, असंही त्यांनी सुचवलं आहे. ते म्हणाले, धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. त्यांनी शिक्षणावर अधिक बोलंल पाहिजे. हिंदू हे अल्पसंख्यांक राज्यात आहे. कर्नाटकात सीमाभागात हिंदू अल्पसख्यांक आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.