Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : 'कालची कार्टी शिवसेना संपवायला निघाली आहेत, पण आम्ही आयोगाला चुना मळत बसायला लावणार'

छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांच्या विषयी अजिबात आदर नाही.

सकाळ डिजिटल टीम

२०२४ च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी पाटण व कोरेगावातील गद्दारांना गाडावे.

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यासारखी सध्या शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था झाली असून, या किल्ल्याने अनेक घाव झेलले आहेत. छत्रपतींचे येथील वंशज सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) अजिबात आदर नाही, असं स्पष्ट मत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

प्रतापसिंह महाराज कधीही विरोधकांपुढे झुकले नाहीत; पण त्यांच्या वंशजांनी भाजपशी तडजोडी केली आहे, अशी टीकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कलामंदिरात झाला. लक्ष्मण हाके, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षद कदम, बाबूराव माने, हणमंत चवरे आदींची प्रमुख उपस्थितीत होती.

या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारसह भाजप, मोदी, शहांसह पालकमंत्री शंभूराज देसाईंवर (Shambhuraj Desai) टीकेची झोड उठवली. राऊत म्हणाले, ‘‘मला माफी मागण्याची सवयी नाही, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. शिवसेना संपली म्हणतात तीच शिवसेना आज आम्ही रस्त्यावर पाहात आहोत. आता ही शिवसेना धगधगत्या मशालीचे अग्निकुंड झाले आहे. सध्या शिवसेनेची अवस्था अजिंक्यतारा किल्ल्यासारखी झाली आहे. या किल्ल्याने छातीवर आणि पाठीवर अनेक घाव झेलले आहेत. आता शिवसेना गद्दारीचे घाव झेलत आहे, तरीही आमची शिवसेना टिकून आहे; पण कितीही काही झाले तरी शिवसेनेची बस कधीही रिकामी राहिली नाही. कायम हाऊसफुल राहिली आहे.’’

शंभूराज देसाईंवर टीकेची झोड उठवताना राऊत म्हणाले, ‘‘ते पाटणचे पापाचे पित्तर शंभू की चंभू... शिवसेना नसती तर त्यांना मंत्रिपदही मिळाले नसते. त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले व शिवसेनेला ताकद दिली. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे काम चालू होते. त्या वेळी या भागातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना वाढली पाहिजे, अशी भूमिका घेतली; पण ही कालची कार्टी शिवसेना संपवायला निघाली आहेत. महाराष्ट्र मोदी, शहापुढे कधीही झुकणार नाही आणि वाकणारही नाही. निवडणूक आयोग बेकायदेशीर असून, या आयोगाला चुना मळत बसायला लावणार आहोत. आगामी काळात दिल्ली आणि महाराष्ट्र भगव्याचे राज्य येणार आहे.’’

ते पुढे म्हणाले, की छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांच्या विषयी अजिबात आदर नाही. साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज कधी झुकले नाहीत; पण त्यांच्या वंशजांनी भाजपशी तडजोडी केली. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी पाटण व कोरेगावातील गद्दारांना गाडावे. या वेळी बाबूराव माने, लक्ष्मण हाके, सचिन मोहिते आदींची भाषणे झाली. संजय राऊत यांचे आगमन होताच वाघ आला रे वाघ आला शिवसेनेचा वाघ आला, अशी घोषणाबाजी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT