Sanjay Raut demand elections on ballot paper instead of EVMs even after Congress historic win in Karnataka esakal
महाराष्ट्र बातम्या

Election Result : इव्हीएमवर विश्वास नाहीच! काँग्रेसच्या कर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतरही हवं 'बॅलेट पेपर'

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवत बहुमत गाठलं. दरम्यान या निवडणूक निकालानंतर देखील ईव्हीएम मशीनवर आपला विश्वास नसल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

देशभरात कोणत्याही निवडणूकीत भाजपच्या विजयानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जातात. निवडणूक मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. दरम्यान आता कर्नाटकात काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. त्यानंतर आता ईव्हीएम मशीनबद्दल तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारला असात राऊत बोलत होते.

ईव्हीएमच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, "कर्नाटकमध्ये जरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी ईव्हीएम विषयी आमच्या भूमिका कायम आहेत. बॅलेट पेपर हाच लोकशाही सिध्द करण्याचा मार्ग आहे"

राऊत पुढे म्हणाले की, "आता हे म्हणतील की, तुम्ही कर्नाटकमध्ये तर जिंकलात. हो जिकंलो. आम्ही महाराष्ट्रात देखील विधानसभा, महानगरपालिका जिंकू. तरीही आमची ईव्हीएमविषयीची मागणी कायम आहे. आम्हाला बॅलेट पेपरवर देशभरात निवडणूका हव्यात" असे खासदार संजय राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT