EKnath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

राऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांच्या नादी लागून त्यांनी शिवसेनेचं वाटोळं केलं, अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून राऊतांच्या घरामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे. वातावरण तापलं असून घराबाहेर राऊत समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. अशातच या कारवाईमुळे आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून येत आहे. (Sanjay Shirsath on Sanjay Raut ED enquiry)

शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsath) यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हुशार नेते आहेत. त्यांना ईडी वगैरे कशाची भीती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे की आम्ही जे करतो ते खरं आहे. जेव्हा एवढी मोठी धाड पडते, तेव्हा अटकेची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला. ज्याच्यामुळे, ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना (Shivsena) फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे. हा काही लोकनेता नाही, तो प्रवक्ता होता. त्यामुळे त्याच्याविरोधात काही उठाव वगैरे होणार नाही. सूड कसला, जो जैसा करेगा वैसा भरेगा!

संजय राऊतांनी (Sanjay Raut) चौकशी सुरू असतानाच एक ट्वीट केलंय. बाळासाहेबांची शपथ घेऊन मी सांगतो की, मी कोणताही घोटाळा केलेला नाही. काहीही झालं तरी मी शिवसेना सोडणार नाही, अशा आशयाचं हे ट्वीट होतं. त्याबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शपथ घेऊ नको. तेवढा मोठा तो नाही. तो अधिकार फक्त आम्हाला आहे. आम्ही शिवसेनेसाठी ४० वर्षे राबलो आहे. नोकरी करता करता नेते होणं सोपं आहे. शिवसेना सोडू नको, एक दिवस उद्धव साहेब स्वतः त्याला हाकलतील. आम्ही पाहिलंय याच माणसाने शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेचं वाटोळं केलंय. आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका सांगत असताना या माणसाने तिकडे जाणं कसं बरोबर आहे हे सांगितलं होतं. आता ईडीची चौकशी सुरू आहे. यावेळी त्याच्या अटकेची शक्यता नाकारता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: शम्स मुलानीच्या ६ विकेट्स! मुंबईकडे ३१७ धावांची आघाडी, ओडिसाला दिला फॉलो ऑन

Narendra Modi: लोकसभेचा धसका? तब्बल 49 मिनिटे भाषण, फक्त काँग्रेस, काँग्रेस अन् काँग्रेस! महायुतीसाठी पंतप्रधान अॅक्शन मोडमध्ये

Narendra Modi in Dhule: ''त्या दिवशी मी गप्प बसलो पण...'' मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची 'ती' इच्छा, पंतप्रधानांचा धुळ्यात शब्द

Latest Maharashtra News Updates : जुन्नर पोलिसांनी साडेतीन लाखाच्या ३५ मोबाईलचा घेतला शोध

Solapur Assembly Election : तुतारी ते ट्रम्पेट : बार्शी वगळता 'या' 10 मतदारसंघात 'ट्रम्पेट'; कोणाची चालणार जादू?

SCROLL FOR NEXT