Sanjay Raut on Devendra Fadnavis over Aurangabad name google
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांना 'उप'मुख्यमंत्री म्हणणं जड जातंय - संजय राऊत

हा सेनेचा मुख्यमंत्री नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदेंनी भाजपाचा हात धरला. देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तास्थापन केली आणि दोघांनाही अनपेक्षितपणे आपापली पदं मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यावरुनच आज संजय राऊतांनी टोला लगावला आहे. (Sanjay Raut News)

संजय राऊतांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, उप हा शब्द त्यांच्यासमोर लावणं खूप जड जातंय. त्यांना माजी किंवा भावी मुख्यमंत्री म्हटलं जावं. त्यांनी आपल्यावर सुरू असलेल्या ईडी कारवाईबद्दलही भाष्य केलं आहे.

सरकार आणि एकनाथ शिंदेंवर टीका करताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि असं वागायचं. आम्हाला बाळासाहेबांनी प्राण जाए पर वचन ना जाए असं शिकवलं. ठाण्यातल्या बॅनरबाजीवरुन एकनाथ शिंदेंनी गुमराह करण्याचा प्रयत्न केलाय. हा सेनेचा मुख्यमंत्री नाही, हे उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT