Eknath Shinde vs Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

"शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर"; शिंदेंच राऊतांना प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे यांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

दत्ता लवांडे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच राऊतांच्या टिकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू..." असं प्रत्युत्तर शिंदे यांनी राऊतांना दिले आहे.

(Eknath Shinde News)

शिवसेनेचे संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. "बंडखोर आमदारांचे मृतहेद महाराष्ट्रात येतील, ते जिवंत प्रेत आहेत आणि त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल." असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं होतं. "गुवाहटीमध्ये एका मंदिरात रेड्यांचा बळी दिला जातो त्या मंदिरात बळी देण्यासाठी आम्ही ४० रेडे पाठवले आहेत." अशी बोचरी टीका राऊतांनी बंडखोर आमदारांवर केली होती.

गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार, हे मजा करतायत ते दिसतंय खात पित आहेत, उड्या मारत आहेत ती जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची जीवंत प्रेत मुंबईत येतील, मग त्यांच्या पोस्टमार्टमसाठी विधानसभेत पाठवावे लागेल, मी एवढंच बोललो यात चुकीचं काय आहे, असे राऊत म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात शिंदे समर्थकांमध्ये अनेक पडसाद उमटले होते. काही ठिकाणी राऊत यांचे पुतळे जाळण्यात आले होते. तसेच तुमच्या बापाचे नाव लावून निवडणूक लढवा असंही राऊतांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हा वाद जास्त पेटला होता. त्यावर शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "बाळासाहेबांची शिवसेना दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांचे समर्थन कशी करू शकते? यासाठीच आम्ही हे पाऊल उचललं आहे. यामुळे तुम्ही आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.." असं जोरदार प्रत्युत्तर शिंदे यांनी दिलं आहे.

"मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.." असं ट्वीट करत शिंदे यांनी राऊतांना प्रत्युत्तर देताना शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मरण आलं तरी बेहत्तर अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT