मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून, येत्या जून महिन्यामध्ये राज्यसभेसाठी निवडणूका पार पडणार आहे. दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत येत्या 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम राऊत प्रस्थापित करणार आहे.
चार जुलै रोजी हे खासदार होणार निवृत्त
राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे, तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या रिक्त जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चार माजी खासदाराची नावे चर्चेत असून, यामध्ये चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्यसभेसाठी संजय राऊत 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, निवड पात्र झाल्यास महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा मान राऊत यांना मिळणार आहे. याआधी नजमा हेपतुल्ला महाराष्ट्रातून सलग 4 वेळा ( एकूण 6 टर्म ) राज्यसभेवर (1980-2018) निवडून गेल्या आहेत. तर, काँग्रेसकडून सरोज खापर्डे पाच वेळा राज्यसभेवर (72-2000) निवडून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.