मुंबई : संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळताचा कथित फोटो शेअर केला आहे. यावरुन आता राजकारण तापलं आहे.
राऊतांना प्रत्युत्तर देताना भाजपनं देखील ट्वीट करत आदित्य ठाकरेंचा मद्य सेवन करतानाचा फोटो शेअर करत सवाल उपस्थित केला आहे.
राऊतांच्या या ट्वीटला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य केलं आहे. (Sanjay Raut shared photos of Chandrashekhar Bawankule in casino Politics emerged on it)
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे याचा कसिनोत जुगार खेळतानाचा कथित फोटो शेअर केला आहे. तसेच पोस्टमध्ये म्हटलं की, "19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, व्हेनेशाईन. (Marathi Tajya Batmya)
साधारण 3.50 कोटी रुपये कॅसिनोत जुगारात उडवले असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्यानं महाशय द्युत खेळले तर बिघडलं कोठे? ते तेच आहेत ना? महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पाहा. हे तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है!"
यानंतर भाजपच्या उत्तराला प्रत्युत्तरही त्यांनी दिलं. ते म्हणाले, "ते म्हणे.. फॅमिलसह मकाऊला गेले आहेत...जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे...कधीच जुगार खेळले नाहीत...मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय?"
संजय राऊतांच्या ट्वीटवर स्पष्टीकरण देताना भाजपनं आदित्य ठाकरे यांचा एका पार्टीतला मद्य सेवन करतानाचा फोटो ट्वीट केला आहे. तसेच म्हटलं की, "आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. (Latest Marathi News)
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी आहेत तिथला हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडं जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजूभाऊ आदित्य ठाकरेंच्या या ग्लासात कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे?
संजय राऊत यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कंबोज यांनी म्हटलं की, "संजय राऊत यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे. माझे जे २५ लाख रुपये तुमच्याकडं आहेत ते तुम्ही अद्याप परत केलेले नाहीत.
याच २५ लाख रुपयांनी तुम्ही तुमचा चांगला इलाज करुन घ्यावा. तुम्ही कधीकाळी आमचे चांगले मित्र होतात तर तुमचा इलाज चांगला व्हावा," असं कंबोज यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.