sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut News : 'सनी देओल यांच्या बंगला २४ तासांत वाचवला, पण नितीन देसाई...'; राऊतांचा गंभीर आरोप

रोहित कणसे

अभिनेता आणि खासदार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांत रद्द करण्यात आला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सनी देओलचं घर वाचवण्यासाठी दिल्लीहून संदेश आला. पण कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कुठलीही मदत केली गेली नाही त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं असा आरोप राऊतांनी केला आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचे खासदार अभिनेता सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदा करणार होती. तब्बल ६० कोटींचं कर्ज ते फेडू शकले नाहीत. बँकेने लिलाव पुकारला आणि लोकांना बोलवलं. आमचं सनी देओल यांच्याशी काही वयक्तिक वाद नाही. पण २४ तासांत तुम्ही तो लिलाव थांबवला. दिल्लीहून संदेश आला. तुम्ही त्यांचं घर आणि त्यांना वाचवलं. पण आपले नितीन देसाई यांचा स्टूडिओ वाचवण्यासाठी वणवण भटकत होते. त्यांनाही कर्ज फेडयचं होतं. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले पण त्यांना काही दिलासा मिळाला नाही. नितीन देसाई यांचा स्टूडिओ आणि जीव देखील वाचवण्यात नाही आला.

चार-पाच हजार कोटींचे बँक घोटाळे समोर येत आहेत, त्याच्यावर कारवाई होत नाही. भाजपशी संबंध असलेल्या लोकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. मात्र नितीन देसाई यांच्या बद्दल असा निर्णय घेण्यात आला नाही. त्यांना मरू दिलं गेलं, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं, असा गंभीर आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला.

चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला सर्वप्रथम जेथे स्पर्श केला, त्या जागेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी यांनी शिवशक्ती पॉइंट असे केले आहे. याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले क भारतीय जनता पक्ष अजून काय करू शकतो.

हे भारताच्या वैज्ञानिकांचं यश आहे. चांद्रयानने जेथे तिरंगा फडकवला आहे, त्या जागेला विक्रम साराभाईंचं नाव दिलं पाहिजे होतं. तसेच विक्रम साराभाई यांना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे. हे सर्व पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी केलेल्या कामामुळे चांद्रयान चंद्रावर गेलं. हे पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई यांचं योगदान आहे.

पण तुम्ही शास्त्रज्ञांना विसरून जाता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता. आम्ही देखील हिंदुत्वाचे पाईक आहोत, पण काही गोष्टी विज्ञानाशी संबंधीत असतात. हे वीर सावरकरांचं म्हणणं आहे. विज्ञानावर कुठल्याही धर्माचं आक्रमण ठिक नाही असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT